पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पपई खा अन् वजन घटवा

पपई

मौसम कोणताही असो  प्रकृती  ही ठणठणीत राहायला पाहिजे. सध्या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे.  अनेकजण वाढत्या वजनानं त्रस्त आहेत. या समस्येवर पपई हे फळ जास्त फायदेशीर ठरू शकतं. पपई रक्त शुद्ध करते पण त्वचा आणि शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासही ती फायदेशीर आहे. 

...म्हणून उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन आवर्जून करावे
 

 - पपईत प्रथिने, खनिजे, ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते. तर पपई पिकताना  त्यातील ‘क’ जीवनसत्त्व हे वाढते. 
- पपईमध्ये पेपेन हा घटक आतडय़ांमधील पाचक रसांची कमतरता, अपायकारक चिकट स्राव व आतडय़ातील दाह कमी करतो. त्यामुळे जेवणानंतर पपई खाल्ली असता अन्नपदार्थ पचण्यास मदत होते. 
- पपईत क जीवनसत्त्व भरपूर असतं. पपई शरिरातील कॉलेस्ट्रॉलचं  योग्य संतूलन राखते. त्यामुळे  कॉलेस्ट्रॉल वाढत नाही तसेच अतिरिक्त  कॉलेस्ट्रॉलमुळे होणारे आजारही उद्भवत नाही. 

- पपई ही अतिरक्तदाब, हृदयविकार यामध्ये उपयुक्त आहे.
- पपईमध्ये कॅलरी या कमी असतात ज्या वाढतं वजन घटवण्यास उपयुक्त ठरतात. 
 - चेहऱ्याच्या सुंदरतेसाठीसुद्धा पपई  गुणकारी आहे. पपईचा किस चेहऱ्यावर लावल्यानं चेहरा उजळतो. तसेच पुटकुळ्या, मुरुमे, सुरकुत्या नाहीशा होतात.
- अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्ठता हे पोटाचे विकार पपईतील पेपेनमुळे दूर होतात.