पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झोपे, अपचन सारख्या समस्यांवर जायफळ फायदेशीर

जायफळ

जायफळ ही भारतीय मसाल्यांमध्ये प्रामुख्यानं वापरली  जाते. जायफळीत अँटी ऑक्सिडंट, रोग प्रतिकारक शक्ती अधिक आहे.  जायफळ ही प्रामुख्याने आतड्यांच्या व पचनाच्या विकारांवर फायदेशीर आहे. ज्यांना झोपेची समस्या आहे अशांनी जायफळ  दुधात टाकून रात्री प्यावं यामुळे चांगली झोप लागते. 
- जायफळ उगाळून कपाळावर तिचा लेप लावल्यासही  झोप लवकर येते. 
- वारंवार थोडे थोडे शौचास होणे, पोटात मुरडून शौचाला होणे, पाण्यासारखे  जुलाब होणे, रक्त पडणे या सर्वांसाठी आणि ‘फूड पॉयझन’मध्ये प्रथमोपचार म्हणून जायफळ खूप उपयोगी आहे.
- सुंठ, वेलची आणि त्यात चिमुटभर  जायफळ पावडर टाकून तयार झालेली  हर्बल टी आरोग्यास फायदेशीर आहे.
- अपचनाच्या  समस्येवर  मध आणि ३ ते ४ थेंब जायफळाच्या तेलापासून तयार केलेलं चाटण फायदेशीर आहे यामुळे लगेच आराम मिळतो.
- सर्दी- खोकल्याच्या समस्येवर एक कप गरम पाण्यात पाव चमचा जायफळ पूड मिसळून त्याचा चहा घ्यावा.