पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

New Year 2020: पार्टी करताना मुलींनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, नाहीतर होईल पश्चाताप

नविन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टी

नवीन वर्षाची प्रतीक्षा अवघ्या काही तासात संपणार आहे. अशामध्ये प्रत्येकालाच २०१९ ला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याची इच्छा आहे. परंतू हे करताना काही खबरदारी घेणे फार महत्वाचे आहे. याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केले तर तुमचे नुकसान होऊ शकते. 

थंडीपासून बचाव -

देशामध्ये सगळीकडे थंडी परसली आहे. नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बरेच जण घराबाहेर जातात. नवीन वर्षाचे स्वागत मध्यरात्रीनंतरच केले जाते.  म्हणून थंडीपासून बचाव करणे खूप महत्वाचे आहे. जर आपण पार्टीसाठी बाहेर जात असाल तर उबदार कपडे सोबत घेऊन जा. जर तुम्ही लहान मुलांना सोबत घेऊन जात असाल तर त्यांची काळजी घ्या. मुलांना न्यूमोनिया होऊ शकतो

मद्यापासून दूर रहा -

बर्‍याच लोकांसाठी पार्टी म्हटले की मद्य आलेच. पण तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत चांगले संगीत आणि भोजन करुन नवीन वर्षाचे स्वागत करु शकता. जर तुम्ही मद्य घेत असाल तर ते मर्यादित प्रमाणात घ्या. मद्यपान करून वाहन चालवू नका, तसेच तुमच्या मित्रांना वाहन चालवू देऊ नका. जास्त मद्यपानामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो.

मद्य पिणे टाळा -

खास करुन मुलींसाठी. जर तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मित्र किंवा प्रियकरासोबत बाहेर जात असाल तर मद्यपान करणे टाळा किंवा तुम्ही तुमचे पेय स्वत: तयार करा. असे केल्यामुळे तुम्ही तुमच्याविरोधात होणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखू शकता. 

स्वतःचे पेय स्वत: तयार करा -

नवीन वर्षानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत अज्ञात व्यक्तीने दिलेले पेय स्वीकारू नका. हे तुम्हाला  मोठ्या अडचणीत टाकू शकते. बर्‍याचदा बेशुद्धावस्थेत काही घटना घडतात ज्यामुळे आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो.

सोशल मीडियावर माहिती शेअर करू नका -

पार्टीमधून परत येईपर्यंत कधीही आपला नंबर, पत्ता किंवा स्थान सोशल मीडियावर पोस्ट करू नका. कोणीही सोशल मीडियावर शेअर केलेली तुमची माहिती सहज वाचू शकतो आणि गैरवापर करू शकतो.

पेपर स्प्रे सोबत ठेवा -

नवीन वर्षाच्या पार्टीमधून परतताना किंवा रात्री उशिरा प्रवास करताना आपल्या बॅगमध्ये नेहमीच पेपर स्प्रे ठेवा. यामुळे तुम्ही आवश्यक वेळी स्वत: ला सुरक्षित ठेवू शकता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:happy new year 2020 girls must keep these things in mind while celebrating new year party