पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुगलच्या Titan M चं संरक्षक कवच भेदणाऱ्याला दहा कोटींचं बक्षीस जाहीर

संरक्षक कवच भेदणाऱ्याला साडेदहा कोटींचं बक्षीस जाहीर

गुगलच्या पिक्सेल फोनमध्ये Bugs शोधून दाखवणाऱ्याला कंपनी १ मिलीयन डॉलर म्हणजे सध्याच्या  भारतीय मुल्याप्रमाणे साधरण ७ कोटींहून अधिकचं बक्षीस देणार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने हा फोन हॅक करून दाखवल्यास त्या व्यक्तीला गुगल तब्बल १.५ मिलियन डॉलर म्हणजेच  साडेदहा  कोटींहून अधिकची रक्कम बक्षीस म्हणून देणार आहे. 

शाओमीनं परवडणाऱ्या दरात भारतात लाँच केले फिटनेस बँड

गुगलचं Titan M हे संरक्षण कवच भेदण्यास यशस्वी झालेल्या संशोधकाला हे बक्षीस मिळणार आहे. गुगलची Titan M ही संरक्षक चीप आहे. हा फोन हॅकर  हॅक करण्याचा प्रयत्न करत असेल तर तातडीनं ते लक्षात येतं. गुगलच्या पिक्सेल डिव्हाइसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. 

टिक-टॉकवर करता येणार खरेदी-विक्री

गुगलनं याआधीही  नव्या डिव्हाइसच्या यंत्रणेत बग शोधण्याचं आवाहन केलं होतं. जर संशोधकांना मोबाइलच्या सुरक्षायंत्रणेत काही त्रुटी आढळल्या तर त्याची माहिती तातडीनं समजते, यात कंपनी त्वरीत सुधारणा  करते. यामुळे युजर्सला त्यांच्या डेटा आणि सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करावी लागत नाही. कंपनी ही युजर्सची माहिती सुरक्षित राहावी याची पुरेपुर काळजी घेऊनच यंत्रणा विकसीत करते मात्र यात चुकून काही त्रुटी राहिलीच तर त्या त्रुटी सुधारल्याही जातात. यासाठी गुगलनं विशेष प्रोगॅमही लाँच केला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Google will reward the top prize of 1 million doller to someone who can break into Google Titan M