पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनचा वाहतुकीवर कसा परिणाम झाला, वाचा गुगलची निरीक्षणे

गुगल मॅप

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे जगातील वेगवेगळ्या देशात लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणच्या वाहतुकीवर कशा पद्धतीने परिणाम झाला आहे, हे दर्शविणारा अहवाल गुगलकडून शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. कोविड-१९ कम्युनिटी मोबिलिटी रिपोर्ट असे या अहवालाचे नाव आहे. 

कोविड १९: मोदींकडून खेळाडूंना पाच सूत्री मंत्र! सचिन-विराटचाही सहभाग

गुगलच्या अहवालात कोणत्या सार्वजनिक ठिकाणी वाहने आणि माणसांच्या हालचालीमध्ये घट किंवा वाढ झाली हे दिलेले आहे. ही माहिती टक्केवारीमध्ये आहे. नेमकी संख्या या अहवालात देण्यात आलेली नाही. या अहवालात १३१ देशांची माहिती आहे. ज्यामध्ये भारतासह बांगलादेश, ब्राझील, कॅनडा, पेरू आणि पाकिस्तान यांचाही समावेश आहे. गेल्या ४८ ते ७२ तासांपासून आधीच्या काही आठवड्यांपर्यंतच्या माहितीचा या अहवालात समावेश केलेला असतो.

या अहवालानुसार भारतात कॅफे, शॉपिंग मॉल्स, सिनेमागृहे, संग्रहालये, वाचनालये यांच्या वाहतुकीमध्ये ७७ टक्के घसरण झाली आहे. त्याचवेळी किराणा दुकाने, औषधे दुकाने यांच्याकडील वाहतुकीत ६५ घट झाली आहे. समुद्र किनाऱ्यावरील वाहतुकीत ५७ टक्क्यांची घट झाली आहे. 

धारावीमध्ये डॉक्टरलाच कोरोना; कुटुंबाला केले क्वारंटाईन

विविध रेल्वे स्थानके, बस स्थानके यांच्याकडील वाहतुकीत ७१ टक्के तर कामासाठी जाण्याच्या ठिकाणांकडील वाहतुकीत ४७ टक्के घट झाली आहे. असे असताना निवासी भागातील वाहतूक २२ टक्क्याने वाढ झाली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.