वेलची ही मसाल्यात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख जिन्नसांपैकी एक. तिखट पदार्थांपासून ते गोडाधोडाच्या पदार्थास ही वेलची छान चव आणते. आपल्याकडे जेवणानंतर मुखशुद्धीसाठी वेलची खाल्ली जाते. वेलचीमुळे दुर्घंधी जाते. पण त्याचबरोबर वेलचीचे अनेक उपयोग देखील आहेत.
उकडलेले मक्याचे दाणे खरंच आरोग्यासाठी चांगले आहेत का?
- मळमळ, उचकी, कोरडा खोकला यावर वेलची फायदेशीर आहे. वेलचीचे दाणे भाजून त्याचे चूर्ण घेतल्यास उचकी व उलटी थांबते.
- वेलची अत्यंत पाचक आहे, त्यामुळे जेवणांनंतर ती खावी.
- त्याचप्रमाणे वेलची ही रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. त्यामुळे जेवल्यानंतर वेलची खाल्ल्यास रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- त्याचप्रमाणे वेचली वजन नित्रयंण ठेवण्यासही मदत करते, असंही एका संशोधनातून समोर आलं आहे.
गगनयान मोहिमेतील भारतीय अंतराळवीरांच्या अवकाशातील जेवणात हे खास पदार्थ