पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून पुदिन्याचा रोजच्या आहारात समावेश करणे उपयुक्त

पुदिन्याचे फायदे

पुदिना हा अत्यंत औषधी म्हणून ओळखला जातो. अनेक लोकांकडून जाणीवपूर्वक पुदिन्याचे सेवन केले जाते. भारतीय स्वयंपाकात पुदिन्याचा वापर जास्त करून चटणीमध्येच केला जातो. पुदिन्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात पुदिन्याचा समावेश असणे उपयोगी ठरते. 

World Photography Day 2019 : हे आहेत उत्तम कॅमेरा फोन

पुदिन्यामध्ये मेंथॉल, प्रथिने, कर्बोदके, व्हिटॅमिन ए, लोह हे सर्व घटक असतात. पुदिन्याची पाने खाल्ल्याने उलटी थांबविता येऊ शकते. त्याचबरोबर पोटातील गॅसही दूर केला जाऊ शकतो. शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी साठलेला कफ बाहेर काढण्यासाठी पुदिना उपयोगी ठरतो. त्याचबरोबर एखादा विषारी किडा आपल्याला चावल्यास अंगाचा होणारा दाह कमी करण्यासाठी आणि विषाचा परिणाम कमी करण्यासाठी पुदिना उपयुक्त ठरतो. 

हा आहे दिशाचा 'फिटनेस मंत्र'

पोटाच्या सर्व प्रकारच्या आजारांसाठी पुदिना उपयुक्त मानला जातो. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आपण वेगवेगळे जंक फूड खात असतो. त्यामुळे पोट दुखणे, पोटाचे वेगवेगळे विकार होणे हे सामान्य झाले आहे. पण यावर पुदिना हे एक घरगुती स्वरुपाचे औषध मानले जाते. पुदिन्याचा एक चमचा रस एक कप कोमट पाण्यात घालायचा. त्यामध्ये एक चमचा मध घालून घेतल्यास पोटाला आराम पडतो. अनेकवेळा जंक फूड खाल्ल्याने बद्धकोष्ट होते. त्यामुळे पोटात दुखायला लागते. पुदिन्याची पाने उकळून त्यामध्ये मध घालून त्या पाण्याचे सेवन केल्यास पोटाचा आजार बरा होऊ शकतो.