पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणेशोत्सव २०१९ रेसिपी : उकडीचे पान गुलकंद मोदक

उकडीचे पान गुलकंद मोदक

मोदक हे गणपतीला सर्वात प्रिय, म्हणूनच गणेशाला 'मोदकप्रिय' असंही म्हणतात. गणपतीसाठी अनेक घरात उकडीच्या मोदकांचा नैवेद्य केला जातो. गुळ- खोबऱ्याचं सारण मोदकात असते पण  खानदानी राजधानीचे शेफ  महाराज जोधाराम चौधरी यांनी पारंपारिक उकडीच्या मोदकांना एक वेगळा ट्विस्ट दिला आहे. त्यांनी गणेश चतुर्थीनिमित्तानं  उकडीचे पान गुलकंद मोदक ही नवी पाककृती वाचकांसाठी आणली आहे. ही पाककृती कशी करायची हे जाणून घेऊन

जाणून घ्या गणपती प्रतिष्ठापनेचे आणि गौरी आवाहनाचे मुहूर्त!

साहित्य :
खायचं ताजं पान बारीक चिरून, ताजा किसलेला नारळ, २० ग्रॅम गुलकंद आणि २० मिली गुलाब  रिसप, तांदळाचं पीठ, तेल, तूप, चवीनुसार मीठ, 
कृती : 
- एका मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवावं यात चवीपुरता मीठ आणि थोडंस तेल टाकावं. पाण्याला चांगली उकळी आली की त्यात तांदळाचं पीठ भिजवून घ्या. गॅस बंद करावा. चार ते पाच मिनिटं पीठ झाकून ठेवावं.
- उकड काढलेलं पीठ नीट मळून घ्यावं आणि त्याचे लहान गोळे वळून घ्यावे.
- एका भांड्यात किसलेला नारळ,  गुलकंद, बारीक चिरलेलं खायचं पान आणि २० मिली गुलाब रिसप एकत्र करून मोदकासाठी सारण तयार करून घ्यावं. 
- हाताला  तूप लावून मोदक वळून घ्यावेत त्यात सारण भरावे. त्यानंतर तयार झालेले मोदक मंद आचेवर उकडून घ्यावेत.