पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणेशोत्सव २०१९ रेसिपी : माव्याचे मोदक

मावा मोदक

सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. गणेशोत्सवा निमित्ताने बाप्पासाठी घरामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य केला जातो. बाप्पाला सर्वात जास्त मोदक आवडतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार केले जातात. बाजारामध्ये माव्याचे मोदक मिळतात. मात्र हेच मोदक घरी सोप्या पध्दतीने कसे तयार करायचे हे जाणून घेऊया

माव्याचे मोदक बनवण्यासाठी आवश्यक साहित्य -
- ४०० ग्रॅम मावा
- १/४ कप साखर
- १/४ चमचा वेलची पावडर
- चिमुटभर केशर

माव्याचे मोदक बनवण्याची कृती - 
सर्वप्रथम, मोदक तयार करण्यासाठी नॉन स्टिक पॅन मंद आचेवर गरम करावा. त्यामध्ये मावा आणि साखर टाकावी. मावा आणि साखरेचे मिश्रण तयार झाल्यानंतर त्यामध्ये केशर टाकावी. आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत रहा. त्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करावे. आता गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होण्यासाठी थोडावेळ बाजूला ठेवा. त्यानंतर त्याचे मोदक तयार करावेत.