पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणेशोत्सव २०१९ रेसिपी : मॉकटेल मोदक

मॉकटेल मोदक

गणपती निमित्तानं पुढचे काही दिवस रोज घरी गोडाचा बेत असणार हे नक्की. यादिवसांत तुम्हाला काही हटके पाककृती तयार करायची असेन तर 'मॉकटेल मोदक' ही डिश नक्की करून पहा. मनरंगी रेस्ट्रानं या आगळ्या वेगळ्या अशा 'मॉकटेल मोदक' ची रेसिपी शेअऱ केली आहे.

साहित्य : व्हॅनिला आइस्क्रीम ५० ग्रॅम, गूळ २५ ग्रॅम, किसलेला नारळ ५० ग्रॅम, एक लहान चमचा तूप, चिमुटभर वेलची पावडर, एक ग्लास दूध,  सुकामेवा

कृती : एक तव्यात तूप गरम करून घ्यावे, त्यात किसलेला नारळ परतवून घ्यावा. नारळाचा किस सोनेरी रंगाचा झाला की त्यात गूळ घालावं. गूळ चांगलं वितळलं की या मिश्रणात काजू, पिस्ता, बदाम किंवा आवडीप्रमाणे सुकामेका घालावा. सारं मिश्रण एकजीव करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावं. त्यात व्हॅनिला आइस्क्रीम आणि चिमुटभर वेलची टाकून  मिक्सरमध्ये हे मिश्रण पुन्हा फिरवून घ्यावं.  अशाप्रकारे मॉकटेल मोदक डिश तयार होईल. ही डिश गारेगार सर्व्ह करावी. सर्व्ह करताना मोदकाचं गार्निश करावं.