पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सॅमसंग ‘Galaxy Fold’ या दिवशी होणार लाँच

गॅलेक्सी फोल्ड

सॅमसंग कंपनीचा बहुप्रतिक्षित असा गॅलेक्सी फोल्ड कधी लाँच होतोय याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. हा फोन १८ ते २० सप्टेंबर दरम्यान लाँच होणार असल्याचं समजतं आहे.  याच दरम्यान अॅपल कंपनीदेखील आपला फोन लाँच करणार आहे. 

सॅमसंगच्या गॅलेक्सी फोल्ड या फोनची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून होती. या फोनची स्क्रीन फोल्ड (दुमडता) करता येणार आहे. तंत्रज्ञान विश्वातला हा नवा आविष्कार मानला जात आहे. त्यामुळे सॅमसंगचे ग्राहक  या फोनची आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा फोन एप्रिल महिन्यात लाँच होणं अपेक्षित होतं मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे  या फोनची लाँचिग तारीख बदलण्यात आली.

'आयफोन ७ प्लस'च्या जागी साबणाची वडी, १ लाखांची नुकसान भरपाई

हा फोन दक्षिण कोरियात पहिल्यांदा लाँच होणार आहे. त्यानंतर अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटनमध्ये लाँच करण्यात येईल. गॅलेक्सी फोल्ड  भारतात लाँच करण्यात येणार की नाही हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.  या फोनमध्ये ७.३ इंचाचा फ्लेक्सिबल अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तर फोल्ड केल्यानंतर या फोनचा डिस्प्ले हा ४.६ इंचाचा होणार आहे.