पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सौंदर्य खुलवण्यासाठी या घरगुती उपायांचा वापर जपून करा

हे घरगुती उपाय टाळा

रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधनांमुळे त्वचेला हानी पोहोचते. त्यामुळे अनेक महिला सौंदर्यप्रसाधनांचा वापर टाळतात. सौंदर्य खुलवण्यासाठी काहींची पसंती ही पूर्वापार चालत आलेल्या  घरगुती उपायांना असते. मात्र अनेकदा या घरघुती उपायांचा चुकींच्या पद्धतीनं केलेला वापर हा त्वचेस अधिक नुकसान पोहोचवू शकतो.  त्यामुळे घरगुती उपाय करताना आधिकच काळजी घ्या.

बेसन 
बेसनाचा वापर हा उत्तम नैसर्गिक स्क्रब म्हणून केला जातो. बेसनामुळे चेहरा साफ आणि उजळ होतो. चेहऱ्यावरची मृत त्वचा, पेशी बेसनामुळे निघतात. त्यामुळे नैसर्गिक स्क्रब म्हणून  बेसनाचा पर्याय उत्तम आहे.  मात्र तुमची त्वचा ही अधिक रुक्ष असेन आणि त्यातून मुरुमांचा त्रास असेन तर  बेसन न वापरण्याचा सल्ला  डॉ. रिंकी कपूर यांनी दिला आहे. 

मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी गरज पोषक आहाराची

बेकिंग सोडा 
ब्लॅक हेड रिमूव्हर म्हणून बेकिंग सोडा वापरला जातो मात्र बेकिंग सोड्यात pH मात्रा अधिक असते. त्यामुळे त्वचेची जळजळ, खाज येणे किंवा त्वचेवर लाल चट्टे येऊ शकतात, त्यामुळे अतिप्रमाणात याचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो. 

चुना
चेहऱ्यावर आलेली मुरुम चटकन घालवण्यासाठी काहीजण त्या ठिकाणी चुना लावतात, मात्र असं न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कारण यामुळे लाल चट्टे किंवा डाग चेहऱ्यावर येण्याची भीती अधिक असते हे डाग दीर्घ काळही राहू शकतात त्यामुळे मुरूम घालवण्यासाठी चुना वापरु नये.

Health tips: मनुके खाल्ल्याने होतात हे सहा फायदे