पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'लोक फाल्तू खर्च कमी करत आहेत', विक्री घटल्यानं फुलविक्रेते चिंतेत

व्हॅलेंटाइन डे

'व्हॅलेंटाइन डे' म्हणजे प्रेमाचा दिवस. हा दिवस लाल रंगाचं गुलाब किंवा सुंदर पुष्पगुच्छांविना अपूर्ण आहे.  प्रेमाची कबुली देताना जोडीदाराच्या हात रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ किंवा गुलाब नाही तर मज्जा नाही ! मात्र गेल्या वर्षभरात व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी फुलांच्या  विक्रीत  म्हणावं तितकी तेजी नाही म्हणून फुलविक्रेते  चिंतेत आहेत. 

'नोव्हेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या काळात मी वर्षभरापेक्षा तिप्पट व्यवासाय केला होता, याकाळात फुलांची विक्री अधिक होते मात्र तुलना करायची झाली तर नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० मध्ये फुलांच्या विक्रित कमालीची घट झाली आहे. फुलांवर किंवा पुष्पगुच्छांवर पैसे खर्च करायला आता लोक तयार होत नाही', अशी खंत मुंबईतल्या एका फुल विक्रेत्यानं व्यक्त केली. 

व्हॅलेंटाइन डेला 'मन की बात' बोलण्याआधी...

'आता  लोक फाल्तू खर्च कमी करत आहेत', अशी प्रतिक्रिया आयफ्लोरिस्टच्या  भरत कटारिया यानं व्यक्त केली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत फुलांची विक्री प्रचंड घटली आहे असं तो म्हणाला.  दिवसाला केवळ ४० गुलांबांची विक्री होते मात्र व्हॅलेंटाइन डेला किमान ३०० ते ४०० गुलाबांची विक्री व्हावी अशी आशा त्यानं व्यक्त केली आहे. 

लोक फुलांवर पैसे खर्च करायला तयार होत नाही त्यापेक्षा एखादी चांगली वस्तू जी कायमस्वरुपी त्यांच्या जवळ राहिल, अशी भेटवस्तू खरेदी करण्यास त्यांचं प्राधान्य असतं, असं माय फ्लोरिस्टचे लोकेश कश्यप म्हणाले.  लोकांमध्ये पर्यावरणाविषयीही जागरुकता वाढली आहे, त्यामुळे फुलं देण्यापेक्षा एक रोपटं लावण्याकडेही काहींचा कल असतो, असंही एका विक्रेत्यानं सांगितलं. 

Recipe : घरच्या घरी तयार करा स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री