पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतात नोकियाचा टीव्ही, जाणून घ्या किंमत

नोकिया टीव्ही

मोबाइल विश्वात राज्य गाजवल्यानंतर नोकिया कंपनीनं आता टीव्ही लाँच केला आहे. फ्लिपकार्ट या इ- कॉमर्स साइटनं भारतात नोकिया टीव्हीची घोषणा केली. हा टीव्ही १० डिसेंबरपासून प्रेक्षकांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. 

इन्स्टाग्रामचा वापर करण्याआधी युजर्सना उघड करावी लागणार ही माहिती

या टीव्हीमध्ये ५५ इंचाचा अल्ट्रा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये intelligent dimming, wide color gamut, आणि dolby vision सारखे फीचर देण्यात आले आहेत. 

व्हॉट्स अ‍ॅपचं 'डार्क मोड' फीचर नेमकं आहे तरी काय?

या टीव्हीत क्वाड कोअर प्रोसेसर, २.२५ जीबी रॅम आणि १६ जीबी रोम असणार आहे. हा टीव्ही अँड्राइड ९.० ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार आहे. साउंड क्वालिटीसाठी कंपनीनं JBL च्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या टीव्हीची भारतात किंमत ४१, ९९९ पासून सुरु होत आहे.