पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सणासुदीसाठी घराचा मेकओव्हर करण्यासाठी पाच सोप्या टीप्स

घर सजावटीच्या आकर्षक टीप्स

सणासुदीच्या काळात अनेकांचे घरांना रंगरंगोटी करण्याचे किंवा घर सजवण्याचे  प्लान असतात. तुम्हाला ही घराला आकर्षक अशी सजावट करून आपल्या घरचं रुपडं पालटायचं आहे का? तर गोदरेज इंटेरिओचे जनरल मॅनेजर-डिझाईन श्री. ललितेश मांद्रेकर यांनी काही सोप्या टीप्स दिल्या आहेत. घराची  सजावट करताना या टीप्सची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. 

-  घर सजवताना तुम्ही ते अधिकाअधिक साधं पण तितकंच देखणं कसं दिसेल याचा विचार करा. पर्यावरण-सॅव्ही टाइल्स, कॉइर मॅट, बाम्बू चेअर्स व रॅटन दिवे यांचा वापर तुम्ही करू शकता. काही इनडोअर प्लांटचाही वापर तुम्ही  घरात केला तर घरातील वातावरण अधिक प्रसन्न दिसेल. 

- आता  रेट्रो टेराझ्झोचा ट्रेंड पुन्हा आला आहे आणि तो टिकून राहणार आहे. त्यामुळे तुम्ही सजावट करताना या ट्रेंडचाही विचार करु शकता. चकित करणाऱ्या पॅटर्नपासून व्हेनेटाइन डिझाइनपर्यंत विविधता विचारात घेता, ही डिझाइन तुमचे घर आकर्षक बनवतात.

 पावसात खराब झालेल्या घरांच्या भिंतीचं सणासुदीच्या दिवसांत करायचं काय?

-  पांढरीशुभ्र भिंत आणि त्यावर विविध रंगाचे वॉल हँगिंग तुम्ही वापरू शकता. सौम्य रंगावर गडद रंगाचे वॉल हँगिंग, कुशन, पडदे व कारपेट शोभून दिसातात. अशी रंगसंगती वापरून तुम्ही घराला एक वेगळं रुप देऊ शकता. 

- सोशल स्पेस व स्पेस सेव्हिंग हे सध्या नवे ट्रेंड आहेत. घरांचे आकार कमी होत असल्याने जगभरातील डिझायनरनी डिझाइनमध्ये नावीन्य आणून जागेच विविध प्रकारे वापर सुरू केला आहे. त्यामुळे घरासाठी फर्निचर निवडताना तुम्ही अनेक प्रकारे उपयोगी येईल आणि जागाही वाचवतील अशा फर्नीचरचा उपयोग करु शकता. 

- घर सजवण्यासाठी तुम्ही अँटीक वस्तूंचाही चांगल्या प्रकारे  वापर करु शकता. या वस्तूंमुळे घराला एक वेगळी शोभा येते.

वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या मुंबईकरांचा कार पुलिंगकडे वाढतोय कल