पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घराबाहेर पडताना घ्या छोटीशी काळजी, त्वचेच्या समस्येपासून होईल सुटका

त्वचा समस्या

बाहेरचं वातावरण खूपच प्रदूषित होत चाललं आहे.  त्यातून अनेक शहरातील तापमानाचा पारा हा ४० अंश सेल्शिअसपेक्षाही अधिक चढला आहे.  तापमानवाढीमुळे सतत येणारा घाम, बाहेरचं प्रदूषण यामुळे त्वचेलाही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्वचेवर पुरळ उठणं, त्वचा निस्तेज होणं, मुरूम येणं किंवा एलर्जी यांसारख्या समस्यांचा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे. या समस्यांपासून त्वचेचं रक्षण कसं करावं यासाठी त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. निशा माहेश्‍वरी यांनी काही छोट्या टिप्स दिल्या आहेत. या टिप्स वापरून आपण काळजी घेतली तर त्वचेच्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होईन. 

- निष्काळजीपणा दाखवू नका
अनेकदा  त्वचेच्या  आरोग्यबद्दल लोक निष्काळजीपणा दाखवतात. यामुळे एलर्जी, फंगल इंफेक्शन यांसारख्या समस्या आणखी वाढू शकतात. 
- चेहरा हात झाका 
हवेत असे काही धुलीकण असतात ज्यामुळे अनेकदा त्वचेवर पुरळ उठतात. अशावेळी तुम्ही जर जास्त प्रदूषित ठिकाणी प्रवास करत असाल तर चेहरा हा नेहमीच झाकून  ठेवा. 
- सनस्क्रीम
प्रखर सूर्यकिरणांमुळेही त्वचेला त्रास होऊ शकतो. अशावेळी  डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुमच्या त्वचेसाठी योग्य अशी  सनस्क्रीनची निवड करा. यामुळे सूर्यकिरणांपासून पोहोचणाऱ्या हानीपासून तुमची त्वचा सुरक्षित राहते. 

नाश्ता करताना या चुका आवर्जून टाळा

- योग्य आहार  
ज्यांच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशाच व्यक्तींना आरोग्याशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच आहारात योग्य जीवनसत्त्वे, प्रथिने  असलेल्या संतुलित आहाराचा समावेश करा. 
- योग्य कपड्यांची निवड 
उन्हामुळे खूप घाम येते तेव्हा घाम टिपून घेणारे सुती कपडे वापरा. शरीरावर घाम एकदा का सुखला की पुढे पुरळ उठणं किंवा इतर समस्या जाणवू लागतात. 
- स्वच्छता  
त्वचारोगासाठी नेहमची  स्वच्छाता ही तितकीच महत्त्वाची असते. तुम्ही स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं तर ही समस्या अधिक वाढत जाते.