पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

असं ठेवा मुलांना मोबाइलच्या व्यसनापासून दूर

प्रातिनिधिक छायाचित्र

मुलं सतत मोबाइलचा वापर करतात ही आजच्या पालकांची तक्रार असते. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात मुलं जास्तीत जास्त वेळ घरातच बसून घालवतात. बहुतेक मुलं टीव्ही, स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्सना चिकटून असतात. ते क्वचितच शरीराला व्यायाम देतात किंवा बाहेर जाऊन खेळतात. 'कॉमन सेन्स मीडिया' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ८ ते १२ वर्षे वयोगटातील मुलं दररोज ऑन- स्क्रीन मीडियावर किमान ४ तास ४४ मिनिटं घालवतात, तर किशोरवयीन मुलांमध्ये हेच प्रमाण सरासरी ७ तास २२ मिनिटे आहे. ही बाब पालकांसाठी अत्यंत चिंतेची बाब ठरत आहे. 

अनावश्यक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचे नाही? मग हे करा....

दहापैकी नऊ पालकांना आपल्या मुलांनी बाहेरच्या जगात, निसर्गाशी नाते जोडत आपले बालपण घालवावे असे वाटत आहे. तेव्हा आपल्या मुलांना फार कमी वयात मोबाइल आणि सोशल मीडियाच्या व्यसनातून वाचवायचं असेल तर पालाकांनी हे मार्ग नक्की अवलंबले पाहिजे. फेव्हिक्रिएटमधील तज्ज्ञांनी पालकांसाठी काही पर्याय सुचवले आहेत हे पर्याय कोणते ते पाहू. 

कलाकुसरीत सहभाग 
मुलांना कलाकुसरीमध्ये गुंतवा. त्यांना आपली सर्जनशीलता उंचावण्यासाठी चौकटीबाहेरचा विचार करण्यासाठी चालन द्या. हस्तकलेत गुंतल्याने मुलांच्या मेंदूला चालना मिळते आणि त्यांची एकाग्रता वाढते. कलेमुळे मुलांना वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये आत्मसात करता येतात.

गोव्यातील या प्रसिद्ध ठिकाणी फोटोसाठी भरावा लागणार ५०० रुपयांपर्यंत कर

बाहेर खेळा 
मुलांना सगळ्यात जास्त आवडतं, ते बागेत खेळणं. झोक्यापासून घसरगुंडीपर्यंत मुलांना सगळं काही तिथे खेळता येतं. फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेटसारखे खेळ आणि दोरीच्या उडया, सायकलिंगसारख्या इतर गोष्टी. ही यादी न संपणारी आहे. मोकळ्या हवेत  खेळण्यामुळे शारीरिक विकास होतो, शिवाय तो मुलांची शैक्षणिक क्षमता विकसित करण्याचा अभिनव मार्ग आहे. बाहेर खेळण्यामुळे मुलांचे संवादकौशल्य सुधारते, कारण त्यांना आपणहून आपल्या कोशातून बाहेर येऊन तर मुलांशी बोलावे लागते. त्याशिवाय विकासाच्या टप्प्यावर असताना मैदानी खेळ मुलांना मोटर सेन्स, हात व डोळ्यांचा समन्वय आणि एकंदर कामगिरी उंचावण्यास मदत करतात. तेव्हा तुमच्या मुलांना मोकळ्या हवेत खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या व त्यांना काही मजेदार खेळ खेळू द्या. 

गोष्टी  सांगा 
मुलांना गोष्टी सांगा. गोष्ट ऐकणं हे कोणत्याही लहान मुलाला आवडेल. त्यामुळे मुलांना बिरबल, पंचतंत्र, इसापनितीच्या गोष्टी सांगा.

छंदाला प्रोत्साहन द्या
मुलांच्या छंदाला प्रोत्साहन द्या. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो. अनेक मुलांना नृत्याची, गाण्याची, अभिनयाची  आवड असते. त्यात मुलांना गुंतवा. यामुळे मुलांचा भावनिक विकास होतो त्यांच्या सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीस चालना मिळण्यास मदत होते. 

प्रदूषणापासून शरीराची काळजी घेणारे हे चार मसाले

सहलीला जा
मुलांना ट्रेकिंग, हायकिंग, कॅम्पिंगसाठी घेऊन जा. यामुळे त्यांना नवीन गोष्टी अनुभवता येतील.