पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सौंदर्य खुलवण्यासाठी फायदेशीर मेथीचे दाणे, जाणून घ्या कसे

मेथी Image courtesy: Shutterstock.

सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक जण सौंदर्यप्रसाधनांचा भरपूर वापर करतात. मात्र सौंदर्यप्रसाधनांपेक्षा योग्य आहार, व्यायाम आणि नैसर्गिक घटकांनीच सौंदर्य अधिक खुलतं असं नेहमीच आपण ऐकत आलोय. ब्युटी एक्स्पर्टही जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांचा वापर करण्याचा सल्ला देतात. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेला नैसर्गिक घटक म्हणजे मेथीचे दाणे होय. 

मेथीच्या दाण्यात लोह, तांबे, फास्फरस यांसारखी खनिजे, ब ६ आणि क सारखी जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात जी त्वचेच्या अनेक समस्येवर रामबाण उपाय म्हणून काम करतात.  चला तर पाहू मेथीच्या दाण्याचे काही फायदे 

हे पाच पदार्थ त्वचेला देतील नैसर्गिक उजळपणा

काळे डाग आणि मुरुम
चेहऱ्यावरचे काळे डाग आणि मुरुम दूर करण्यासाठी मेथी फायदेशीर आहे. यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भीजत ठेवा. दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट फेसपॅक म्हणून १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवून टाका. यामुळे मुरुम, पुरळ निघून जाण्यास मदत होते. 

नैसर्गिक स्क्रब 
मेथीच्या दाण्यांचा नैसर्गिक स्क्रब म्हणूनही वापर करण्यात येतो. मेथीचे दाणे, कच्च दूध, ओट्स आणि गुलाबजल एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टनं चेहऱ्यावर हलका मसाज करा. नंतर कोमट पाण्यानं फेसपॅक धुवून टाका. 

आवळा करतो मुरमाचे डाग दूर

चेहऱ्याला नैसर्गिक उजळपणा देण्यासाठी उपयुक्त 
मेथीच्या दाण्याचा उपयोग चेहऱ्याला नैसर्गिक उजळपणा देण्यासाठीही केला जातो. मेथीच्या दाण्याची पावडर, दूध किंवा दह्यात मिक्स करा. हे पॅक चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत होते. 

केसगळतीपासून बचाव
केसगळतीच्या समस्येपासून मेथीचे दाणे बचाव करतात. गरम खोबरेल तेलात मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर हे तेल दुसऱ्यादिवशी केसांच्या मुळांना लावा यामुळे केसगळती कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळते. 

महागड्या क्रिमला विसरा! ही फळे आणि भाज्या खाल्ल्याने त्वचा होते चमकदार