पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..म्हणून शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय स्थूलता

फास्टफूडचे दुष्परिणाम

आजची पिढी सकस अन्न खाण्यापेक्षा फास्टफूडकडे अधिक वळत आहे. पोळी भाजीपेक्षा पिझ्झा, बर्गर सारखे जंक फूड मुलांना अधिक प्रिय होऊ लागले आहेत. मात्र यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्थूलपणा वाढत चालला आहे, अशी माहिती प्रयागराजमधल्या मेडिकल कॉलेजच्या डॉ. सरिता बजाज यांनी दिली आहे.

ऑफिस बॅगचं वजन नेमकं हवं तरी किती?

फास्ट फूडच्या अधिक सेवनानं शालेय मुलांचं पोट सुटत चाललं आहे तर मुली स्थूलतेच्या अधिक शिकार होत चालल्या आहेत असंही त्या म्हणाल्या. यासाठी त्यांनी युपीएआईपीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनाचा दाखलाही दिला. एकूण ८ शाळांतील १२ हजार विद्यार्थ्यांवर हे संशोधन करण्यात आलं. या १२ हजार विद्यार्थ्यांपैकी १९ % विद्यार्थी हे  स्थूलतेचे शिकार आहेत. ही मूल मैदानी खेळ कमी खेळतात आणि फास्ट फूडचा जास्त समावेश या मुलांच्या जेवणात असतो असंही संशोधनादरम्यान समोर आलं आहे. 

फास्ट फूड खाण्याचे मुलांवर होणारे परिणाम
- फास्टफूडच्या अतिरिक्त सेवनानं मुलांमध्ये स्थूलता वाढते. 
- मुलांमध्ये मधूमेहाचं प्रमाण वाढतं.
-  मुलांच्या यकृतावर परिणाम होतो.