पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी सेलिब्रिटींचे हे हटके साडी ट्रेंड तुम्ही नक्की ट्राय करा

(छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)

नवीन वर्ष उजाडलं आहे, नव्या वर्षांत नवे फॅशन ट्रेंडसही आले आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत साडीनं फॅशनविश्वात नवी ओळख प्राप्त केली आहे. साडीला ग्लॅमरची किनार लाभली आहे.  पाश्चिमात्य ऑऊटफिटपेक्षा हल्ली अनेक अभिनेत्री रेड कार्पेट लूक, प्रमोशनसाठी साडीला पहिली पसंती देत आहे. काळानुसार साडीला नव्या ट्रेंड आणि फॅशनचाही स्पर्श झाला आहे. त्यामुळे सध्या फॅशनविश्वात साडीचा कोणता ट्रेंड चर्चेत आहे ते पाहू. 

आय मेकअपचे २०२० मधले हे आहेत नवे ट्रेंड्स

सिल्क साडी
सिल्क साडी ही नेहमीच चर्चेत राहिली आहे. विशेषत: लग्नसराई किंवा रिसेप्शन पार्टीसाठी असा लूक तुम्ही ट्राय करू शकता. डिप नेकलाईन आणि प्लेन सिल्क साडी हा ट्रेंड सध्या चर्चेत आहे. 

 बेल्ट नवा स्टाईल स्टेटमेंट 
साडी आणि बेल्ट एकत्र वापरण्याची कल्पना आपण यापूर्वी कधीही केली नसेल. मात्र फॅशन विश्व हे नेहमीच नवनवीन प्रयोग करण्याला प्राधान्य देतं. तेव्हा साडीला थोडा पाश्चिमात्य स्पर्श करणारा हा ट्रेंड आहे. पुर्वी सोन्या,  चांदीचा कंबरपट्टा बांधण्याची फॅशन होती आता याच फॅशनला मॉर्डन टच मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही.  त्यामुळे साडी आणि त्यावर लेदर बेल्ट अशा बॉसी लूकची सध्या चलती आहे. 

कमीत कमी अ‍ॅक्सेसरीज 

साडी म्हटलं की दागदागिने आले. ठुशी, चिंतामणी, लांब पदराचा हार, बांगड्या, झुमके सारं काही ओघानं आलं. सध्या कमी पण तितक्याच प्रभावी स्टाइलचा ट्रेंड आलाय. मोठ मोठे आणि भरपूर दागिन्यांचा ट्रेंड केव्हाच मागे सरला आहे. तर यंदा साडीवर एक भरजरी चोकर ( गळ्याबरोबर बसणारी अ‍ॅक्सेसरी) किंवा एक स्टेटमेंट नेकपिसची चलती आहे. त्यामुळे तुम्ही लग्नसराईसाठी दागिन्यांची निवड करणार असाल तर हा ट्रेंड पाहून दागिन्यांची निवड करा.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#closeup 📸 @ipshita.db @nehachaudhary_ #mymains #chaudhraeen #ipsdips

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

ऑक्साइड ज्वेलरी 
पारंपरिक कुंदन, डायमंड किंवा स्टोन दागिन्यांबरोबरच सध्या पेस्टल शेड्सच्या साडी आणि ऑक्साइड ज्वेलरी हा ट्रेंड चर्चेत आहे. विशेषत: ऑक्साइड ज्वेलरी या सर्वच साडीवर शोभून दिसत असल्यानं हा ट्रेंड ट्राय करायला हरकत नाही.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

😌 Necklace - @pradejewels Nosepin - @aadyaaoriginals Styled by @bapatshweta

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

कॉटन साडी 
या वर्षांत कॉटन साडीचा ट्रेंड टिकून राहणार आहे. या साड्या कम्फर्टेबल असल्यानं तरुणींची विशेषत: नोकरदार तरुणींची या साड्यांना अधिक पसंती असते. ऑफिस, पार्टी, लग्न अशा कोणत्याही ठिकाणी या साड्या अधिक सहज कॅरी करता येतात. विशेषत: लेदर बेल्ट  किंवा ऑक्साइड ज्वेलरी कॅरी करून एक छान ट्रेंडी लूक तुम्ही कॅरी करू शकता.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आमची लाडकी आणि प्रिय मैत्रीण नेहा पेंडसेचं लग्न पुण्यात थाटामाटात पार पडलं. संगीत रजनी, साखरपुडा आणि लग्न अश्या तीन दिवसीय आलिशान विवाहसोहळ्यात खूप मज्जा आली. तीन ही दिवस themebased पेहराव होते. त्याचे photos social media वर post केल्यामुळे हे पेहराव बऱ्याच लोकांना आवडले त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि त्या पेहरावांच्या details बद्दल खूप जणांनी विचारलं. So त्याचे details मी इथे देतेय. Day 1 : Sangeet Night Theme : Indo Western Blouse : Denim Crop top Saree : Cotton saree from @chidiyaaonline Make-up, Hair n Styling by me. Pc : @saneshashank Day 2 : The Sundowner ( Engagement Ceremony ) Theme : Smart Casuals Top : @zara @zaraindiaofficial Skirt : @zara Make-up, Hair n Styling by me. Pc : @danadedisha Day 3 : Saptpadi Theme : Indian Traditional Saree: Brocade benarsi silk saree from local Benaras shop Make-up, Hair n Styling by me. @suhaslakhan धन्यवाद! #nehhawedshardul #foreveralways

A post shared by Hemangii Kavi (@hemangiikavi) on