पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फेसबुक न वापरणाऱ्यांनाही FB Live ऐकता येणार, नवे फिचर

फेसबुक

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे अनेक ऍपच्या वापरामध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. फेसबुकच्या वापरामध्येही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेत फेसबुक लाईव्ह फिचर वापरण्याच्या प्रमाणात सुमारे ५० टक्के वाढ झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता फेसबुकने आपल्या लाईव्ह पर्यायामध्ये काही नवे फिचर देण्याचे निश्चित केले आहे.

पुणे: विभागीय आयुक्तांनी जपली माणुसकी, ज्येष्ठ नागरिकांना केली मदत

फेसबुक ऍपचे प्रमुख फिजी सिमो यांनी नवीन फेसबुक लाईव्ह फिचरबद्दल माहिती दिली. या नव्या फिचर्समध्ये सर्वात वेगळे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फेसबुकवर नसलेल्या लोकांनाही फेसबुक लाईव्ह ऐकता येईल. यासाठी फेसबुक लाईव्हमध्ये फक्त ऑडिओ हा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. फेसबुकवर नसलेले किंवा लॉगआऊट केलेले युजर्सही या पर्यायामुळे लाईव्हवरील चर्चा, संवाद ऐकू शकतील.

हा पर्याय सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी फेसबुककडून लवकरच टोल फ्री डायल इन पर्याय देण्यात येईल. या डायल इनच्या माध्यमातून कोणीही फेसबुक लाईव्हवरील चर्चा ऐकू शकेल. 

अवघ्या पाच मिनिटांत कोरोनाची चाचणी, अमेरिकेत तंत्रज्ञान विकसित

फेसबुकवरील निर्मात्यांसाठी पैसे कमाविण्याची सुविधाही आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे पैसे कमाविता येतील. फेसबुक लाईव्हवर सांगितिक कार्यक्रम सादर करणाऱ्यांना याचा उपयोग होईल. युजर्सना फेसबुककडून स्टार विकत घ्यावे लागतील. प्रत्येक स्टारची किंमत ०.०१ डॉलर इतकी असेल. यानंतर युजर्स त्यांना आवडणाऱ्या फेसबुक लाईव्हला हे स्टार देतील. त्यातून संबंधित फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना पैसे मिळतील. ऍमेझॉनने ट्विचच्या माध्यमातून ही सुविधा सुरू केली आहे.