पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फेसबुक तयार करतोय असा कॉम्प्युटर जो वाचू शकतो तुमच्या डोक्यातील विचार

ब्रेन रिडिंग कॉम्प्युटर

तुमच्या डोक्यात नक्की काय विचार सुरू आहेत, याची कल्पना करणं समोरच्या व्यक्तीला जवळपास अशक्य आहे. तुमचा मेंदू क्षणाक्षणाला काय विचार करतो हे सांगणारा 'मनकवडा' फक्त कवीकल्पनेत अस्तित्त्वात आहे. मात्र फेसबुक कंपनी तुमच्या डोक्यातील विचार वाचणारी मशिन तयार करण्यावर सध्या झोकून काम करत आहे. 

फेसबुक 'ब्रेन रिडिंग कॉम्प्युटर' या प्रणालीवर काम करत आहे, पहिल्यांदा २०१७ साली झालेल्या F8 परिषदेत फेसबुकनं आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली होती. सध्या 'ब्रेन रिडिंग कॉम्प्युटर' हा लहान ओळी आणि काही शब्द अचूक ओळखत आहे, अशी माहिती संशोधकांनी दिली आहे. 

रस्त्यात सापडलेलं पैशांचं पाकीट लोक खरंच परत करतात का?

मात्र हे पुरेसं नसून 'ब्रेन रिडिंग कॉम्प्युटर'नं अधिक प्रभावीपणे काम करणं अपेक्षित आहे, त्यामुळे मिनिटांला १०० शब्द ओळखू शकणारी प्रणाली विकसित करण्यावर सध्या आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत असंही संशोधक म्हणाले. 

टिक-टॉक स्मार्टफोन येणार, कंपनीनं दिला वृत्ताला दुजोरा

ज्या व्यक्ती मुकबधिर आहेत किंवा आजारांमुळे ज्यांनी आपली वाचा गमावली  आहे अशा रुग्णाच्या डोक्यातील विचार वाचण्यासाठी या  तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावीपणे वापर करता येईन असा विश्वास या  तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या संशोधकांनी व्यक्त केला आहे.  मात्र तुर्त 'ब्रेन रिडिंग कॉम्प्युटर' हा व्यावसायिक कारणांसाठी वापरण्याकरता तयार नाही असं फेसबुकनं स्पष्ट केलं आहे.