पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इन्स्टाग्राम, फेसबुकमुळे ब्रेकअपचा त्रास होतो सर्वाधिक !

इन्स्टाग्राम, फेसबुकमुळे ब्रेकअपचा त्रास सर्वाधिक होतो

प्रेमात 'स्व' उरत नाही असं म्हणतात. प्रेमात आपण स्वत: ऐवजी दुसऱ्याचा विचार करू लागतो. मात्र हेच प्रेम जेव्हा आपल्या आयुष्यातून दूर निघून जातं तेव्हा  तुटलेल्या त्या हृदयाच्या तुकड्यांत स्वत:चं अस्तित्त्व शोधणं  अवघड होऊन जातं. आपण आपलं आयुष्य एखाद्या नात्यासाठी समर्पित केलंय पण त्याचबरोबर त्या नात्यात आपण एवढं गुंतलो आहोत की स्वत:ला गमावून बसलो आहे ही  ब्रेकअपनंतर झालेली जाणीव अत्यंत क्लेशदायक असते. विशेषत: फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया या त्रासाला सर्वाधिक कारणीभूत असतात.

जोडीदाराचा फोन तपासणं योग्य की अयोग्य?

  काही दिवसांपूर्वी Proceedings of the ACM on Human-Computer Interaction’मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनामुळे आजच्या पीढीला इन्स्टाग्राम, फेसबुकमुळे ब्रेकअपचा त्रास सर्वाधिक होत असल्याचं समोर आलं आहे. ब्रेकअप झाल्यानंतर सर्वात आधी लोक आपल्या एक्स जोडीदारास सोशल मीडियावरुन रिमुव्ह, अनफ्रेंड, अनफॉलो करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अनफ्रेंड, अनफॉलो केलेल्या एक्सचा सोशल मीडियावर कधीना कधी सामना होतो, असं या संशोधनातून समोर आलं आहे. 

आपल्या एक्सला सोशल  मीडियाच्या अकाऊंटवरून अनफ्रेंड, अनफॉलो केल्यास त्याचा भविष्यात आपल्याला कधीही सामना करावा लागणार नाही असं अनेकांना वाटतं पण ठराविक अंतरानंतर त्यांच्यांशी निगडीत अनेक लहान मोठ्या गोष्टींचा फिड आपल्याला इन्स्टाग्राम, फेसबुकवर दिसू लागतो यामुळे जुन्या आठवणी ताज्या  होऊन अधिक मनस्तापास सुरुवात होते. 

नाती जपायची असतील तर या गोष्टींचं भान नक्की ठेवा

आपण  एक्सला अनफ्रेंड, अनफॉलो केलं असलं तरी आपले काही मित्र किंवा दोघांचे कॉमन फ्रेंड त्या एक्सच्या संपर्कात असतात. अशावेळी त्यांच्याकडून एक्सच्या सोशल मीडिया पोस्टला लाइक करणं, त्यांच्यासोबत फोटो शेअर करणं, त्या पोस्टवर कॉमेंट करणं यांसारख्या गोष्टी आपल्या मनाला अधिक बोचू लागतात. आपल्या जवळच्या मित्रमैत्रींणीही एक्स जोडीदाराच्या संपर्कात राहू नये असंही मनोमन वाटू लागतं, यातून गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीतर तर स्वाभाविकच चिडचिड अधिक होते. 

काही वेळा  एक्सचे कुटुंबीय जर सोशल मीडियावर असतील तर ‘People you may know' च्या यादीत ते दाखवतात. त्यामुळे सोशल मीडियावर अशा अनेक लहान मोठ्या गोष्टीमुळे मनाला  त्रास होऊ लागतो त्यामुळे केवळ  एक्स जोडीदारास सोशल मीडियावरुन अनफ्रेंड, अनफॉलो करणं इतकी गोष्ट तुटलेल्या नात्यातून बाहेर येण्यास पुरेशी ठरत नाही.  

 

ब्रेकअप- पॅचअप अन् पुन्हा ब्रेकअपचा खेळ ठरू शकतो घातक