पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक!, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक

फेसबुक

फेसबुकवरील युजर्सचा डेटा पुन्हा एकदा लीक झाल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून पुढे आली आहे. एकूण २६.७ कोटी युजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

कोरोनाचा प्रतिकार करण्यात भारतीय मानसिकदृष्ट्या सक्षम - चिनी तज्ज्ञ

सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपनी सोफोसने दुसऱ्या एका कंपनीने केलेल्या संशोधनाच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये एकूण २६.७ कोटी फेसबुक युजर्सची सर्व वैयक्तिक माहिती लीक झाल्याचे समोर आले आहे. ५४० अमेरिकी डॉलरला डार्क वेबवर विकण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे. फेसबुकच्या एकूण वापरकर्त्यांच्या तुलनेत ०.०००२ युजर्सची माहिती लीक झाल्याचे म्हटले आहे. 

फेसबुकच्या वापरकर्त्यांचे युजर आयडी, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, रिलेशनशीप स्टेटस आणि वय ही माहिती लीक झाली आहे. अर्थात यामध्ये युजर्सचे पासवर्ड देण्यात आलेले नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे. 

हुकुमशहा किम जोंगच्या आजारानंतर उत्तर कोरियात लष्करी हालचालींना वेग

सायबल या कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणात डेटा कसा काय लीक झाला हे नेमकेपणाने समजू शकलेले नाही. फेसबुकच्या थर्ड पार्टी एपीआयमधील त्रुटींमुळे हा डेटा लीक होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. फेसबुकच्या सर्व वापरकर्त्यांनी याची नोंद घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, असेही आवाहन या कंपनीने केले आहे.  

डार्क वेब म्हणजे काय?
सर्वसाधारण युजर्सकडून वापरले जाते त्याला क्लिअर वेब म्हटले जाते. त्याच्याविरुद्ध डार्क वेब असते. त्याची रचना पूर्णपणे वेगळी असते. डार्क वेबवरील माहिती सर्च इंजिनपासून दडविली जाते. सर्च इंजिन क्राऊलर्सना ती शोधता येत नाही. डार्क वेब हाताळण्यासाठी आपल्याकडे काही ठराविक सॉफ्टवेअर असणे आवश्यक असते.