पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इन्स्टाग्रामवर ‘likes’ चा आकडा दिसणार नाही

Facebook update, Instagram likes ,

इन्स्टाग्राम हे आजच्या घडीला सर्वाधिक वापरलं जाणारं फोटोशेअरिंग अॅप आहे. सुरुवातीला फक्त फोटो  शेअर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या माध्यमाचा उपयोग आता अनेक कारणांसाठी होत आहे. जाहिरातीसाठी, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी, व्यवसायासाठी या अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या अॅपमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे. युजर्सच्या अकाऊंटवरून  ‘likes’ आकडा काढण्याचा विचार कंपनी करत आहे. 

 फोटो आणि व्हिडिओला मिळणाऱ्या ‘likes’ चा आकडा पाहून अनेकदा युजर्स मत तयार करतात. ‘likes’चा हा आकडा त्यांच्या निर्णय क्षमतेवरही परिणाम करू  शकतो  म्हणूनच कंपनीनं  ‘likes’ चा एकूण आकडाच अॅपवरून अदृश्य करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्राम  हे फोटोशेअरिंग अॅप आहे, इथे लाखो  फोटो दरदिवशी अपलोड होत असतात या कलेची सुंदरता पाहण्यापेक्षा, ती अनुभवण्यापेक्षा केवळ  ‘likes’ वर लोक मत तयार करतात. अनेकांसाठी कलाकृतीपेक्षाही ‘likes’चा  आकडा महत्त्वाचा असतो  हे चुकीचं आहे असं कंपनीला वाटतं म्हणूनच कंपनीनं इन्स्टाग्रामवरून ‘likes’ चा आकडा पूर्णपणे काढून टाकण्याचा विचार करत आहे. 

वाचा : F8 : यापुढे तुमच्या फोन आणि डेस्कटॉपवर असं दिसेल फेसबुक

यापूर्वी ट्विटरनं असा  प्रयोग करून पाहिला होता. लाईक्सच्या फुगवट्याकडे लक्ष देण्यापेक्षा लोकांनी  आशय पाहावा, तो समजून घ्यावा असं ट्विटरचं  मत होतं. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:facebook company testing a feature that removes the total number of likes on photos and videos on Instagram