पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

F8 : यापुढे तुमच्या फोन आणि डेस्कटॉपवर असं दिसेल फेसबुक

Mark Zuckerberg , F8 annual developer conference

फेसबुक सर्वाधिक वापरली जाणारी सोशल मीडिया साईट आहे. दरवर्षी  युजर्ससाठी काहीतरी वेगळं देण्याकडे  कंपनीचा भरणा असतो.  फेसबुकच्या Annual F8 Developer Conference मध्ये मार्क झकरबर्गनं फेसबुकचं एक नवं रुप सादर केलं. फेसबुकच्या या नव्या रुपाची चर्चा सध्या सगळीकडे आहे. 

फेसबुकच्या नव्या अपडेटला FB5 नावाने ओळखलं जाईल असं सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जाहीर केलं. अमेरिकेत सध्या रिडिझाईन केलेलं फेसबुक दिसत आहे. जगभरातील युजर्सनां येत्या काही दिवसांत फेसबुकचं बदललेलं रुपडं पाहायला मिळणार आहे. स्टेटस अपडेट बॉक्सच्या वर आता युजर्सनां Stories चा आयकॉन हा पूर्वीपेक्षा मोठा  दिसणार आहे. त्याच्या बाजूला न्यूज फीड हा पर्याय दिसणार आहे. याद्वारे युजर्सनां जगभरातल्या ताज्या बातम्या, चालू घाडामोडींची माहिती जाणून घेता  येणार आहे.

Annual F8 Developer Conference

पण त्याचबरोबर डाव्या बाजूला महत्त्वाचे आणि आगामी कार्यक्रम, गेम्स, जुन्या आठवणींचा संच पाहायला मिळणार आहे. या सगळ्या फीचर्ससाठी शॉर्टकट तयार करण्यात आला  आहे. तर उजव्या बाजूला  फ्रेंड्स आणि ग्रुप सजेशन्स पाहायला मिळणार आहेत.  Messenger साठीही नव्या फीचर्सची घोषणा मार्कनं या परिषदेत केली आहे. मेसेंजरची डिझाइन पुन्हा एकदा ठरवण्यात येणार आहे यामुळे स्टेटस मेसेज सेट करणं आणि फोटो शेअर करणं पूर्वीपेक्षा सोपं होणार आहे. विशेष म्हणजे मेसेंजरचं नवं व्हर्जन 30MB पेक्षा कमी मेमरी वापरुन फोनमध्ये सेव्ह करता येणार आहे, म्हणजे आधीपेक्षा 20% कमी मेमरी वापरली जाणार आहे. मेसेंजरवर चॅट करताना फेसबुकचे व्हिडीओ दोन्ही युजर एकत्र पाहू शकतील. तसंच फेसबुक याचवर्षी डेस्कटॉपसाठीही मेसेंजरचं नवं व्हर्जन लाँच करणार आहे असं त्यांनी सांगितलं. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:F8 annual developer conference Facebook announced a big redesign to its mobile and desktop version