पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आय मेकअपचे २०२० मधले हे आहेत नवे ट्रेंड्स

२०२० मधले हे  आहेत नवे ट्रेंड्स

मेकअपमध्ये २०१८- १९ वर्षांत वेगवेगळे ट्रेंड्स पहायला मिळाले. विशेषत: या वर्षांत न्यूडशेड्स, नोमेकअप अशा काही  ट्रेंड्सची चलती पहायला मिळाली होती. मात्र वर्ष सरलं आहे. २०२० उजाडलं  आहे, तेव्हा या वर्षांत मेकअपमध्ये काही नवे आणि तितकेच कलात्मक ट्रेंड्स पहायला मिळणार आहेत. पेस्टल आयशॅडो, व्हाइट, निऑन आयलाइनर, प्लोटिंग लायनर असे काही आयमेकअपच नवे ट्रेंड्स पहायला मिळणार आहेत. हे ट्रेंड्स कोणते ते पाहू.

...म्हणून ऑफिस डेस्कच्या शेजारी छोटसं रोपटं आवर्जून ठेवावं

पेस्टल आयशॅडो
न्यूड किंवा स्मोकी आयशॅडो लूकनंतर आता पेस्टल आयशॅडोचा ट्रेंड आला आहे. त्यातून बेबी पिंक, ब्लू,  गोल्ड अशा शेड्सची चलती पहायला मिळत आहे. 

(छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )

व्हाइट- निऑन आयलाइनर
ब्राऊन, ब्लू, ब्लॅक आयलाइनर शेड्सनंतर आता अधिक बोल्ड अशा व्हाइट- निऑन आयलाइनरचा ट्रेंड आला आहे. हे आयलायनर अधिक उठवदारही दिसतात आणि नव्या कलात्मक ट्रेंड्सलाही हे आयलाइनर साजेसे ठरणार आहेत.

(छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )

प्लोटिंग आयलाइनर
२०२० मधला प्लोटिंग आयलाइनर हा आयमेकअपमधला नवा ट्रेंड आहे. आयलाइनर पापण्यांच्या कडेवर न लावता काही अंतर राखून वर लावण्याचा हा हटके ट्रेंड आहे. विशेषत: पार्टीलूकसाठी हा ट्रेंड खास ठरणार आहे. 

(छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )

८० च्या दशकातील ब्लश
फॅशन विश्वात अनेक ट्रेंडस येतात काही वर्षांनी परत जातात. तर या वर्षांत ८० च्या दशकातील ब्लशचा ट्रेंड परत आला आहे. ब्लश केवळ गालावर न लावता चिकबोनवर वरपर्यंत  अप्लाय करण्याचा हा नवा ट्रेंड आहे. 

(छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )