पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅपलच्या पोतडीतून काय काय निघणार?

आयफोन अनावरण सोहळा

अ‍ॅपलच्या नव्या आयफोन्सचा अनवारण सोहळा आज पार पडणार आहे. सालाबादप्रमाणे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनी आपले नवे फोन्स लाँच करते. यावेळी अ‍ॅपलच्या पोतडीतून काय काय निघणार याची उत्सुकता अ‍ॅपलप्रेमी आणि चाहत्यांना  आहे.

आयफोन  
- कंपनी यावर्षी iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे तीन फोन लाँच करणार आहे. 
-  iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये अद्यावत प्रणालीनंयुक्त असा कॅमेरा असणार आहे. कॅमेरामध्ये विविध फीचर्स ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत. यात वाइड अँगल सेन्सॉर असणार आहेत. या  फोनमध्ये पहिल्यांदाच वेगळा चौकोनी आकाराचा कॅमेरा मॉड्यूल पहायला मिळणार आहे. 
- त्याचप्रमाणे अ‍ॅपल iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max साठी व्हायरलेस चार्जरही लाँच करू शकते. या दोन्ही फोन्समध्ये ओएलईडी स्क्रीन्स असल्यानं याची किंमत ही जास्त असू शकते.

असा पाहता येणार अ‍ॅपलच्या नव्या आयफोनचा अनावरण सोहळा

अ‍ॅपल वॉच
गेल्यावर्षी कंपनीनं आयफोन्ससोबत Apple Watch Series 4 चंही अनावर केलं होतं. यावर्षी कंपनी Apple Watch Series 5 चंही अनावरण करू शकते. या अ‍ॅपल वॉचमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं काही फीचर्स असतील. विशेषत: तुमच्या झोपेविषयी माहिती ठेवणारं ‘Time in Bed tracking’ फीचरही यात असेल असं म्हटलं जातंय. अ‍ॅपल वॉचला ओएलईडी डिस्प्ले असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. 

अ‍ॅपल टॅग 
अ‍ॅपल कंपनी कदाचित अ‍ॅपल टॅग या नव्या ट्रॅकिंग डिव्हाइसचंही अनावरण करणार असल्याची चर्चा आहे. याद्वारे ब्ल्यूटुथ, वॉलेट्स, कारच्या चाव्या यांसारख्या गोष्टी चटकन शोधायला मदत होईल असं म्हटलं जात आहे.