पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..म्हणून लांब, सरळ केसांना भारतीय महिलांचं प्राधान्य

भारतीय महिलांचं प्राधान्य लांब, सरळ केसांना

भारतीय महिलांचं प्राधान्य हे लांब, सरळ केसांना असतं. विशेषत: दर तीनपैकी विवाहासाठी इच्छुक असलेल्या दोन महिला या लांब आणि सरळ केसांविषयी जास्त आग्रही असतात. लग्न जुळताना लांब,  सरळ केस हे चांगली छाप उमटवतात असं महिला मानतात. 

Beauty Tips : नारळाचं दूध केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर

तर ८७% लोक हे महिलांनी तोकडे केस ठेवू नये असा सल्ला देतात.  डव्ह हेअरतर्फे एक संशोधन करण्यात आलं, यावेळी केसांविषयी रंजक माहिती समोर आली. लांब, सरळ केस हे कुरळे किंवा तोकडे आणि रंगवलेल्या केसांपेक्षाही अधिक सुंदर असतात असं ७१% भारतीय महिलांचं म्हणणं आहे. 
हल्ली हेअर कलर्सचा ट्रेंड आहे. मात्र ४२ % महिलांनी कामाच्या ठिकाणी केस रंगवलेल्या महिला या व्यावहारिक नसल्याच्या मतावर सहमती दर्शवली आहे.

Health Tips : हिरव्या बदामाचे पाच फायदे

महिलांनी सौंदर्यांची व्याख्या बदलली पाहिजे. प्रत्येक महिला ही खास असते. कोणीही आपल्या दिसण्यावरून न्यूनगंड बाळगू नये, असं मत हिंदुस्थान युनिलिव्हरचे हरमन ढिल्लो यांनी मांडलं आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:every two in three Indians believe that women with long straight hair have an edge in finding a wedding prospect