पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वृत्तपत्र, दुधाच्या पिशवीला हात लावल्याने कोरोना होत नाही'

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की या वस्तूंवर हा विषाणू असू शकतो. पण त्यामुळे त्याचा फैलाव होतो,

कोरोना विषाणूचे संक्रमण दुधाची पिशवी, वृत्तपत्र, चलनी नोटांच्या माध्यमातून होत असल्याची माहिती पूर्णपणे बरोबर नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की या वस्तूंवर हा विषाणू असू शकतो. पण त्यामुळे त्याचा फैलाव होतो, असे म्हणणे निराधार आहे. 

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये IPL घेण्यासाठी बीसीसीआयकडून चाचपणी सुरू

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तूतून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमण होईल, अशी शक्यता खूप कमी आहे. यामुळे दुसऱ्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यताही कमी आहे. कारण हात लावलेली वस्तू किंवा पॅकेट वेगवेगळ्या माध्यमातून पुढे गेलेले असते. वेगवेगळ्या तापमानातून ते जाते. त्यानंतरच ते घरापर्यंत येऊन पोहोचते. त्यामुळे अशा वस्तू किंवा पॅकेट-पिशवीमधून कोरोनाची लागण होतेच असे म्हणता येणार नाही.

कोरोनाविरोधात लढा : रोहित शर्माकडून महाराष्ट्रासाठी २५ लाखांची मदत

केवळ एखाद्या वस्तूवर विषाणू असल्याने तो लगेचच व्यक्तीमध्ये संक्रमित होऊन त्याला आजारी पाडू शकतो, असे थेटपणे म्हणता येणार नाही. यासाठी इतरही घटक महत्त्वाचे असतात. वृत्तपत्र, दुधाची पिशवी इतर कोणते पॅकेट याला हात लावल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे याचाही उपयोग होऊ शकतो.