पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

DIWALI 2019: म्हणून लक्ष्मी पूजनासाठी साळीच्या लाह्या आवश्यक

लक्ष्मी पूजन

शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारीवर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ति, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते, असे दाते पंचागकर्ते यांनी सांगितले.

DIWALI 2019: यमदीपदान का व कसे करावे ?

लक्ष्मीपूजन मुहूर्त  हा सायंकाळी ६:०० ते रात्री ११:३० असा आहे.

नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये ।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूया तव दर्शनात् ॥
अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच ।
भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥


अशी कुबेराची प्रार्थना करावी. यापूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.

DIWALI 2019: वसुबारस- अशी करा वासरासह गाईची पूजा