पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

DIWALI 2019: वसुबारस- अशी करा वासरासह गाईची पूजा

संग्रहित छायाचित्र

वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण- उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसांत होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. याचे कारण नरक चतुर्दशी ते कार्तिक शु. प्रतिपदा या तीन दिवसांत जनतेने मौज मजा करावी, गोडधोड खावे, आनंदी वातावरणात रहावे अशी बळीराजाची इच्छा आणि त्याला मिळालेला वर यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. यावर्षी वसुबारस व धनत्रयोदशी २५ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी एका दिवशी आणि नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन २७ ऑक्टोबर रोजी रविवारी एका दिवशी आलेले आहे, अशी माहिती दाते पंचागकर्ते यांनी दिली आहे.

वसुबारस (२५ ऑक्टोबर २०१९, शुक्रवार)
या दिवशी सौभाग्यव्रती स्त्रीया एकभुक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे खालील श्लोक म्हणून पूजन करतात.


ततः सर्वमये देवि सर्व देवैरलंकृते । मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनी ।।
अर्थ - हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.
या दिवशी दूध, दूधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत.