पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिवाळी पाडवाः वहीपूजनासाठी 'हे' आहेत शुभमुहूर्त

संग्रहित छायाचित्र

वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण- उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसांत होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. यावर्षी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन २७ ऑक्टोबर रोजी रविवारी एका दिवशी आलेले आहे, अशी माहिती दाते पंचागकर्ते यांनी दिली आहे.

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते, असे दाते पंचांगकर्त्यांनी सांगितले आहे.

वहीपूजनाचे मुहूर्त पुढीलप्रमाणे
पहाटे १:५० ते ३:३०, पहाटे ५:३० ते ८:००, सकाळी ९:३० ते ११:००

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:diwali 2019 diwali padwa muhurt of vahi pujan chopda pujan bahi khata pujan by date panchang