पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Diwali : कोकणात फराळ नाही गोडाच्या पोह्यांचा असतो बेत

प्रातिनिधिक छायाचित्र

लाडू, चकली, शेव, करंजी, चिवडा, शंकरपाळे, अनारसे यांचा बेत दिवाळीत रंगतो. दिवाळीच्या आठवडाभर आधीच अनेक गृहिणी फराळाच्या तयारीला लागतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आवर्जून शेजाऱ्या पाजाऱ्यांना फराळाचं आमंत्रण दिलं जातं. घरोघरी फराळ, मिठाईनं भरलेलं ताट जातं, मात्र कोकणातील दिवाळी यासर्वाहून वेगळी असते.

BLOG : सर्वाधिक मिस करतेय... चाळीतली दिवाळी आणि धम्माल मस्ती!

या काळात भात कापणीची लगबग असते त्यामुळे फराळ करण्यासाठी कोणालाही वेळ नसतो. किंबहुना अनेक घरात फराळ केलाच जात नाही. मग कोकणातील अनेक घरात पहिल्या दिवशी दिवाळीला काय करतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच.

तर कोकणातील अनेक घरात पोह्यांचा त्यातूनही गोडाच्या पोह्यांचा बेत रंगतो. भात कापणीच्या पहिल्या फेरीतील भातापासून पोहे तयार केले जातात. पारंपरिक पद्धतीनं पोहे कुटले जातात. हे पोहे शहरात मिळणाऱ्या पांढऱ्या आणि पातळ पोह्यांपेक्षा खूप वेगळे असतात. 

DIWALI 2019: ..म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे केलं जातं अभ्यंगस्नान

काहीसे जाडसर  तपकिरी रंगाचे कुटून आणलेल्या पोह्यांचे  गोड पोहे तयार केले जातात. पोहे भिजवून त्यात गुळ, खोबरं, थोडीशी वेलची पूड टाकली जाते. हा बेत दिवाळीच्या पहिल्या  आवर्जून घरात तयार केला जातो. घरातील देवापुढे पहिल्या पोह्यांचा नैवेद्य दाखवून मगच त्यावर ताव मारला जातो.