पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हा आहे दिशाचा 'फिटनेस मंत्र'

दिशा पटानी

अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या फिटनेसाठी ओळखली जाते. दिशा सोशल मीडियावर अनेकदा वर्कआऊट सेशनचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करताना दिसते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांना फिट राहण्याचा सल्ला देते. तिच्या फिटनेसचं रहस्य काय आहे, तिचा डाएट प्लान काय असतो हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. दिशानं हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखती तिचा 'फिटनेट मंत्र' चाहत्यांना सांगितला आहे. हा फिटनेस मंत्र मी नेहमीच जपते असंही दिशा म्हणाली.

Parsi New Year 2019 : खास पारसी रेसिपी 'चिकन फरचा'

मी नियमितपणे व्यायाम करते. काहीही झालं तरी यात कधीही खंड पडू देत नाही. तुम्ही जे खाता त्याचा लगेच परिणाम तुमच्या त्वचेवर आणि शरिरावर दिसतो. त्यामुळे प्रत्येकानं जंक फूड खाणं टाळलंच पाहिजे. जेवणात सकस आहाराचा समावेश असायला हवा. पण त्याचबरोबर व्यायाम आवर्जून करायला हवा, तो करण्यासाठी कधीही टाळाटाळ करू नये असा फिटनेट मंत्र दिशानं दिला आहे. हा फिटनेट मंत्र मी नेहमीच जपते असंही दिशानं सांगितलं. 

Health Tips : हिरव्या बदामाचे पाच फायदे

व्यायाम आणि आहार या दोघांमध्ये नेहमीच संतुलन असलं पाहिजे, असंही ती म्हणाली.