पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मधुमेह असला तरी दिवाळीचे फरार खाण्याचा आनंद घ्या; पण हे लक्षात ठेवा!

दिवाळी पदार्थ

तुम्हाला गोड खाण्याची आवड असेल. पण तुम्हाला मधुमेहाचा आजार असेल तर तुम्हाला खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमीच गोड खाणं टाळावे. दिवाळीत तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थही खाऊ शकता. पण थोडी काळजी घ्या. जर तुम्हाला गोड खायचे असेल तर घरी बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घ्या. पण हे पदार्थ बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवा.

- मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही दररोज शुगर-फ्री पदार्थ खाऊ शकता हे चूक आहे. 

- जर तुम्हाला खोड खाण्याची इच्छा आहे. तर तुम्हाला जेवणातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करावे लागेल. जेणे करुन शरिरातील साखरेची पातळी नियंत्रित होऊ शकते. 

- दिवाळीत आवडेत पदार्थ खा पण त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवा. 

- खीरमध्ये मध टाका किंवा एक वाटी खीरमध्ये दोन शुगर-फ्री गोळ्या टाका. 

- दिवसातून एक- दोनदा गोड खात असाल तर वर्कआऊट वाढवा. जेणे करुन अतिरिक्त कॅलरी बर्न होतील. 

- एखादा गोड पदार्थ तयार करताना त्यात साखर न टाकता त्यात गोड फळे, खजूर, मनुका, अंजीर टाकून तो गोड बनवू शकता. 

- दिवाळी दरम्यान गोड खाल्ल्यास चिकन, मासे, अंडी, सोयाबिन, राजमा, कडधान्य खा. यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स, पॉलिसॅच्युरेटेड फॅट्स आणि ओमेगा थ्री अॅसिड असतात. जे साखरेची पातळी नियंत्रित करतात.

- कुठे बाहेर जात असाल तर तुमच्यासोबत भाजलेले शेंगणाणे ठेवा. जेणे करुन तुम्ही जास्तवेळ उपाशी राहणार नाही. 

- दिवाळीच्या वेळी डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्या.