पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मधुमेह आणि किडनी विकारग्रस्तांनी करू नयेत अशी कामे...

संग्रहित छायाचित्र

मधूमेह, मूत्रपिंड (किडनी) आणि यकृताचा (लिव्हर) विकार असणाऱ्यांनी रोजच्या जगण्यात काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. खाण्यापिण्याची काळजी घेतली तरच हे विकार नियंत्रित राहू शकतात. त्यामुळे असे विकार असणाऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये, याचीही यादी थोडी मोठीच असते. ज्यांना मधूमेह आहे आणि तो नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलिन घ्यावे लागते, अशा रुग्णांनी कोणताही उपवास करू नये. त्याचबरोबर मूत्रपिंड, यकृताचा विकार असणाऱ्यांनीही कोणताही उपवास न करणेच त्यांच्या फायद्याचे असते. त्यातही तुम्हाला एखादा उपवास करायचा असेल, तर आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषधे घेऊनच तुम्ही तुमचा उपवास करा.

मधुमेहतज्ज्ञ डॉ. ब्रिजमोहन यांच्या सांगण्यानुसार, सर्वसाधारणपणे लोकांना जेवताना किती खावे आणि कुठे थांबावे हे समजू शकत नाही. फार कमी लोकांना ते समजते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी उपवास करताना काळजी घ्यावी. काहीच न खाण्यामुळेही त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. 

डॉ. विशाल गुप्ता यांच्या सांगण्यानुसार गर्भवती महिलांनी उपवास करताना काळजी घेतली पाहिजे. उपवासामुळे त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल व्हायला नको. ज्येष्ठ नागरिक आणि जे क्षयरोगाची औषधे घेत आहेत, त्यांनीही उपवास करताना विशेष काळजी घ्यायला हवी. त्याचबरोबर जे रुग्ण उपचारांसाठी अंथरुणाला खिळलेले आहेत, त्यांनीही उपवास करणे टाळले पाहिजे.