पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गगनयान मोहिमेतील भारतीय अंतराळवीरांच्या अवकाशातील जेवणात हे खास पदार्थ

गगनयान मेन्यू

गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारताकडून पहिल्यांदाच मानवाला अंतराळात पाठविण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो)  गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याचे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगीतले. डिसेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या या मोहीमेची सर्व तयारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अंतराळवीरांच्या भोजनाचीही खास यादी तयार करण्यात आली आहे. 

एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार मैसूरमधील Defence Food Research Laboratory नं अंतराळवीरांसाठी खास जेवणाचा मेन्यू तयार केला आहे. यात एग रोल्स, व्हेजिटेबल रोल्स, इडली, सांबार, मुग डाळ हलवा, व्हेजिटेबल पुलाव या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. अन्नपदार्थ गरम करण्यासाठी फूड हिटरही  अंतराळवीरांना पुरवण्यात येणार आहे.  

४८० रुपये किलो दरात नफा नाही, कोल्हापूरात मटण विक्रेते संपावर

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो)  गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. २०२२ मध्ये गगनयान मोहिम प्रत्यक्षात येणार आहे. के. सिवन म्हणाले, गगनयान मोहिमेसंदर्भात आम्ही २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात काम केले आहे. मोहिमेचे अनेक डिझाईन्स तयार झाले आहेत. या मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या अंतराळवीरांना जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात प्रशिक्षणासाठी रशियाला पाठविण्यात येईल. इस्रोसाठी २०२० अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. याच वर्षात चांद्रयान-३ मोहिम आखण्यात आली असून, त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.

बापरे! एका माशासाठी 'ट्युना किंग'नं मोजली तब्बल १२ कोटींहून अधिक रक्कम