पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिका ठरली BoF 500 च्या यादीत समाविष्ट झालेली एकमेव बॉलिवूड अभिनेत्री

दीपिका पादुकोन

अभिनेत्री दीपिका पादुकोन ही बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन  घेणाऱ्या अभिनेत्रीच्या यादीत दीपिका अग्रस्थानी आहे. पिकू, पद्मावत, बाजीराव मस्तानी सारख्या  चित्रपटातून दीपिकानं बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र्य ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीबरोबरच दीपिका फॅशन आयकॉन म्हणूनही ओळखली जाते.

Laxmmi Bomb : 'लक्ष्मी'च्या रुपातला अक्षय पाहिलात का?

BoF 500  म्हणजेच बिझनेस ऑफ फॅशनच्या यादीत सहभागी झालेली दीपिका ही एकमेव बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे. २.४. ट्रिलयन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या फॅशन इण्डस्ट्रीला वेगळी ओळख निर्माण करून देणाऱ्या जगभरातील अनेक सेलिब्रिटींचा यात सहभाग असतो. BoF 500 च्या सदस्यांनी एकमतानं दीपिकाच्या नावाला  पसंती दिली आहे. 

Video : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू

 

दीपिका ही अनेक मोठ्या ब्रँडची सदिच्छा दूत आहे. ती एप्रिल महिन्यात अमेरिकन व्होग मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली होती. तिनं नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस फॅशन विकमध्येही उपस्थिती लावली होती.  २०१८ सालच्या टाइम मासिकाच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतही दीपिकाच सहभाग होता.