पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मेट गाला'तील आफ्टर पार्टी लूकची प्रेरणा रणवीरकडून

दीपिका पादुकोन

‘मेट गाला’ हा इव्हेंट मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडला. ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’ येथील ‘द कॉस्च्युम इन्स्टिटय़ूट गाला’ यांच्या फॅशन फंड रेझिंगसाठी आयोजित करण्यात येणारा मोठा सोहळा म्हणून तो ओळखला  जातो. या सोहळ्यासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोन  हिनं उपस्थिती  लावली. या सोहळ्यातील दीपिकाच्या फेअरीटेल लूकची खूपच चर्चा झाली.  त्यानंतर दीपिका पिवळ्या रंगाच्या स्लिमफिट ड्रेसमध्ये दिसली. यावर तिनं  अॅनिमल प्रिंट जॅकेट परिधान  केलं होतं. हा लूक पती रणवीरपासून प्रेरित असल्याचं दीपिकानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये सुचवलं आहे.

मेल गालाची यंदाची थीम छायाचित्रकार सुसान सोंटाग यांचे कॅम्पवरील निबंध, नोट्स यावरून प्रभावित होती. या थिमनुसार या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्यांचे आऊटफिट्सही ‘विडंबन, विनोद, नाटकीपणा आणि अतिशयोक्ती’ यावर आधारित होते. मेट गालाच्या पिंक कार्पेटवरील दिपिकाच्या पहिल्या लूकची सर्वांनीच चर्चा केली.  तिचा दुसरा लूक हा पती रणवीरपासून प्रेरित होता असं तिनं इन्स्टाग्राम स्टोरीजमधून सूचवलं आहे.

दीपिका

रणवीर यांची हटके फॅशन ही नेहमीच चर्चेचा विषय असते. कधी कधी त्याच्या फॅशन सेन्सची खिल्लीही उडवली  जाते. मात्र कोणी कितीही खिल्ली उडवली तरी  रणवीर मात्र आपल्या स्टाईलसोबत वेगवेगळे प्रयोग करून पहायला जराही कचरत नाही. लग्नापूर्वी 
एका चॅटशोमध्ये दीपिकानं रणवीरच्या स्टाईलवर आक्षेपही घेतला होता. मला त्याची जगावेगळी फॅशन स्टाईल सहन करावी लागणार आहे असं दीपिका गमतीनं म्हणाली होती. मात्र हिच जगावेगळी  स्टाईल तिच्यासाठी मेट गालातील लूकसाठी प्रेरणा ठरली आहे.