आपल्याकडे सोशल मीडियावर साडी चॅलेंज किंवा जुने फोटो उकरुन काढून त्यावर चारोळ्या पेस्ट करण्याचा ट्रेंड गेल्या दोन तीन दिवसांत धुमाकूळ घालत आहे. घरी बसलेले लोक मनोरंजनासाठी काहीतरी नवीन ट्रेंड शोधत आहेत. अशात 'डालगोना कॉफी'चा ट्रेंडही सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. मूळचा कोरिअन प्रकार असलेल्या या डालगोना कॉफीनं अक्षरश: लोकांना वेड लावलं आहे. त्यामुळे कॉफी प्रेमींच्या सोशल मीडियावर सर्सार डालगोना कॉफीचे असंख्य फोटो दिसतील.
मुळात कॉफी हा पेयाचा सर्वांत इस्टन्ट प्रकार. गरम दूधात कॉफी पावडर आणि साखर घातली की संपलं काम. त्यामुळे कॉफी तयार होण्यासाठी तसा फारसा वेळ खर्च करावा लागत नाही. मात्र डालगोना कॉफी म्हणजे तुमच्या सहनशक्तीची परीक्षा होय. यात कॉफी पावडर, साखर आणि पाणी अगदी फेस होईपर्यंत फेटावी लागते. हा फोम दूधात मिसळला की तयार होते डालगोना कॉफी.
बरीच वेळखाऊ प्रक्रिया असली तरी लॉकडाऊनमुळे अनेकजण घरीच आहेत अशावेळी थोडी मेहनत घ्यायला हरकत नाही. हा यासाठी तुमच्या सहनशक्तीचा आणि मेहनतीचा कस लागेल पण हिंदीत म्हणतात तसं 'सब्र का फल मीठा होता है', त्यामुळे हे व्हायरल ड्रिंक एकदा ट्राय करुन पहायला हरकत नाही.
Tips : घरी कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम करताना पाठ-मान दुखतेय?
पाहा व्हिडिओ