कोरोना विषाणूनं जगभरात पसरवलेल्या अंधकाराला दीप प्रज्वलित करुन रोखण्याचा संकल्प करुया, असे आवाहन पंतप्रधा नरेंद्र मोदींनी केले आहे. ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करुन या नऊ मिनिटांत प्रत्येकाने दरवाज्यात किंवा बालकनीत उभे राहून मेणबत्ती, दिवा,टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट दाखवत कोरोनाविरोधातील लढ्यात एकजूट दाखवावी, असे मोदींनी म्हटले आहे.
कोविड-१९ : आता PM मोदी विरोधकांसोबत चर्चा करणार
यापूर्वी मोदींनी केलेल्या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावेळी टाळी, थाळी वाजवत देशातील कानाकोपऱ्यातील जनतेने अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार मानल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर घरातील दिवे घालवून मेणबत्ती, दिवा,टॉर्चच्या माध्यमातून नवा संदेश देण्यासाठीही जनतेचा चांगला प्रतिसाद मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण २१ ते ४० वयोगटात, आरोग्य मंत्रालय
हरयाणातील एक व्यक्ती आगीच्या संपर्कात आल्याने भाजल्याचे घटना घडली होती. त्याने वापरलेल्या सँनिटायझरमध्ये अल्कोहल असल्यामुळे आगीने पेट घतेल्याचे समोर आले होते. त्यामुळे दिवे पेटवताना तुम्ही जे सँनिटायझर वापरत आहात त्यात अल्कोहल नाही याची खात्री करा. हात धुण्यासाठी साधा साबण वापरला तरी हरकत नाही.भारतीय लष्काराने देखील दिवे पेटवताना हँड सँनिटायझरबद्दल विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.