पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : मास्क कोणी वापरावे?

मास्क

कोरोना विषाणूमुळे मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक लोक मास्क वापरत आहे. मात्र मास्क  वापरणं अनिवार्य नाही, असं आरोग्य मंत्रालयानं पूर्वीही सांगितलं आहे. मास्कऐवजी स्वच्छ रुमाल किंवा स्कार्फनं चेहरा झाकणंही पुरेसं आहे.  आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या सुचनेनुसार कोणी मास्क वापरणं गरजेचं आहे ते पाहू 

देशातल्या ५४ % कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करणं शक्य नाही

-  तुमच्यामध्ये कफ, सर्दी, खोकला यांसारखी लक्षणे आढळली असेल.
- तुम्हाला श्वास घेण्यासाठी अडचणी येत असतील.
-  तुम्ही कोरोना विषाणूनं बाधित आहात किंवा अशा व्यक्तींच्या संपर्कात आला असाल
- तुम्ही रुग्णालयात कोरोना विषाणूची लक्षणं आढळलेल्या रुग्णांसोबत काम करत असाल तरच अशा व्यक्तींनीच मास्क वापरावं  असं या सूचनापत्रकात म्हटलं आहे. 

कोरोनाची लक्षणे आढळल्यास काय करावे?

वापरलेल्या मास्कचे काय करावे? 
- मास्क ओला झाला असेल तर तो त्वरित बदला
- दर सहा तासांनी मास्क बदला.
- मास्कनं तुमचं नाक, तोंड आनी हनुवटी पूर्णपणे झाकली आहे याची दक्षता घ्या. 
- मास्क पुन्हा वापरू नका.
- एका वेगळ्या कचऱ्याच्या डब्ब्यात व्यवस्थित मास्कची विल्हेवाट लावा.
-   मास्क परिधान केल्यानंतर त्याला स्पर्श करणं टाळा. 
- मास्क चेहऱ्यावरुन काढताना बाहेरच्या बाजूस स्पर्श करु नका.
- मास्क गळ्याभोवती अडकून ठेवू नका.
- मास्क काढल्यानंतर त्वरीत साबणानं हात स्वच्छ धूवा

असा असेल घरी कॉरंटाईन केलेल्या व्यक्तीच्या हातावरील शिक्का