पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वर्क फ्रॉम होम' ला सुरुवात करण्यापूर्वी या पाच गोष्टी लक्षात ठेवा

वर्क फ्रॉम होम

काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या 'वर्क फ्रॉम होम' या संकल्पनेनं अनेकांच्या नाकी नऊ आणले आहेत. आजच्या मिलेनियल जनरेशनच्या सोशल विश्वात डोकावून पाहिलं तर कोरोनानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मीम्स हे वर्क फ्रॉम होमवर दिसतील. लोकांचे नुसते व्हॉट्स अॅप  स्टेटस उघडून पाहिले तर तुम्हाला किमान पाच ते सहा व्यक्तींच्या स्टेटसमध्ये वर्क फ्रॉम होमच्या विरोधात मीम्स दिसतील.

लॉकडाऊनचा परिणाम, देशातील १०२ शहरांतील हवेची गुणवत्ता सुधारली

अनेक कर्मचाऱ्यांना घरुन काम करताना अनेक अडचणी येत आहेत. काही पहिल्यांदाच घरातून काम करत आहेत. ऑफिसपेक्षा घरचे कॉम्प्युटर, लॅपटॉप स्लो चालणं, वारंवार इंटरनेट कनेक्शन जाणं, घरात सगळेच असताना लक्ष केंद्रीत करण्यासाठी अवघड जाणं अशा अनेक समस्यांचा सामना  लोकांना करावा लागत आहे. पण तूर्त आपल्या सगळ्यांचा नाइलाज आहे आणि सध्याच्या परिस्थितीची ही गरजही आहे. पण घरुन काम करणंही आपण सहज सोप्प करु शकतो. यासाठी  घरातून काम करायला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी  आवर्जून केल्याच पाहिजे.

एक जागा तयार करा
ऑफिससारखी स्पेस, ती शांतता, ते वातावरण घरी बसून मिळणं शक्य नाही हे प्रत्येकालाच माहिती असेल. मात्र कामाला सुरुवात करण्यापूर्वी आपण  घरात स्वत:ची अशी स्पेस तयार करु शकतो, ही जागा निश्चित केल्यानंतर तिथू बसून काम करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो ही जागा बेडपासून दूर असू द्या. अन्यथा काम करताना आराम करण्याचा मोह आवरणार नाही.

कोरोनामुळे भारतात प्रचंड वाढतोय कंडोमचा खप

टार्गेट तयार करा
कामाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या कामाचं एक टार्गेट तयार करा. तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, कोणतं काम वेळ खाऊ आहे आणि कोणतं काम पटकन होऊ शकतं याची यादी तयार करुन काम करा. कामाचे वेळापत्रक तयार करा.

अधून-मधून ब्रेक घ्या
एकाच जागी दीर्घकाळ बसू नका. ऑफिसची सिटिंग अरेंजमेंट पूर्णपणे वेगळी असते तशी सिटिंग अरेंजमेंट घरी नसल्यानं फार काळ एकाच जागी बसता येत नाही. त्यामुळे अधून मधून पाच एक मिनिटांचा ब्रेक घेऊन रिलॅक्स होउन कामाला सुरुवात करा.

सहाकाऱ्यांशी संपर्कात राहा
दररोज सहकाऱ्यांशी संपर्कात राहा. किमान पाच एक मिनिटे त्यांच्याशी संवाद साधून बोला. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.

लॉकडाऊन: पुणेकरांकडून मदतीचा हात, मजूरांना जेवण वाटप

आरोग्याची काळजी घ्या
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या. दररोज घरी योग किंवा व्यायाम करा. योग्य आहार घ्या.