पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे भारतात प्रचंड वाढतोय कंडोमचा खप

भारतात कंडोमच्या विक्रीत

कोरोनामुळे एकीकडे सगळ्याच उद्योजकांना मोठं नुकसान सहन करावं लागत असताना भारतात एक चक्रावून टाकणारी गोष्ट समोर आली आहे. भारतात गेल्या काही दिवसांत कंडोमचा खप हा प्रचंड वाढला आहे. गेल्या आठवड्यात भारतात कंडोमच्या विक्रीत अचानक २५ ते  ५० टक्के वाढ झाल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. 

एकीकडे लॉकडाऊन असल्यानं लोक अन्यधान्य, औषधे यांचा घरात साठा करू लागले आहेत  तर दुसरीकडे कंडोमचाही खप वाढत चालला आहे. पूर्वी लोक तीन कंडोमचे पाकिट घेऊन जायचे मात्र आठवड्याभरापासून १० ते २० कंडोमची पाकिटे लोक घेऊन जात असल्याचं  दक्षिण मुंबईतील मेडिकल दुकानाचे मालक हर्शल शाह यांनी सांगितलं.

लॉकडाऊननंतर ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट यांच्या सेवांवर हा परिणाम

'गेल्या काही दिवसांत कंडोमच्या मागणीत वाढ  झाली आहे, मी माझ्याकडचा साठा २५% नी वाढवला आहे. ही फार गमतीशीर गोष्ट आहे कारण साधरणत: न्यू इअर किंवा सणांच्या काळात कंडोमची मागणी वाढते मात्र आता चित्र वेगळं आहे', असं याच भागात असलेल्या दुसर्या केमिस्ट मालक अजय सबरवाल यानं सांगितलं. 

सगळं बंद व्हायला लागल्यापासून गेल्या एक दोन आठवड्यात कंडोमची मागणी वाढली आहे, जिथे ग्राहक फक्त एक पाकिट घेऊन जायचा तिथे तो दोन तीन पाकिटं घेऊन जाऊ लागला आहे असं निरिक्षण गुरुग्राममधल्या दिनेश कुमार शर्मा या केमिस्ट मालकानं नोंदवलं आहे.

गुढीपाडवा : .. म्हणून वसंतात श्रीखंड खाणे अयोग्य!

अनेक केमिस्ट मालकांनी गेल्या दोन आठवड्यांपासून कंडोम खरेदीत वाढ झाल्याची माहिती दिली आहे. कंडोबरोबरच गर्भनिरोधक गोळ्यांची मागणीही वाढली आहे असंही  ते म्हणाले. 

'कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या खरेदी करण्याचं प्रमाण तसं कमी असतं मात्र एका  विषाणूमुळे यांच्या खरेदीत झपाट्यानं वाढ होईल अशी कल्पना मी उभ्या आयुष्यात केली नव्हती अशीही प्रतिक्रिया एक विक्रेत्यानं दिली आहे. 

कोरोना इफेक्टः 'वर्क फ्रॉम होम'वर सायबर हल्ल्याची भीती