पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय

चीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय

चिनी  लोकांची '९९६' ही काम करण्‍याची संस्‍कृती हळूहळू भारतातही वाढत चालली आहे, असं गोदरेज इंटेरिओ ‘मेक स्पेस फॉर लाइफ’च्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. '९९६'  या क्रमांकाचा अर्थ होतो आठवड्यातून सहा दिवस सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत काम करणे. ही कामाची संस्‍कृती सामान्‍यपणे चीनच्‍या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्‍या आणि स्‍टार्ट-अप्‍समध्‍ये दिसून येत आहे. 

पगारापेक्षा आजच्या पिढीला हवीये नोकरीत स्थिरता

कामाच्‍या दबावामुळे ६४ % लोकांना वाटतं की ते त्‍यांच्‍या कुटुंबाला पुरेशा प्रमाणात वेळ देत नाहीत, तर २८ % लोक त्‍यांच्‍या जोडीदारासोबत उत्‍तम वेळ व्‍यतीत करू शकत नाहीत. तसेच २१.२ % आणि १६.२ % लोक कामाच्‍या दबावामुळे त्‍यांचे मित्र आणि पालकांना पुरेशा प्रमाणात वेळ देऊ शकत नाहीत. 

वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या मुंबईकरांचा कार पुलिंगकडे वाढतोय कल

कामाच्या गडबडीत अनेकांना व्यावसायिक आणि खासगी आयुष्य यातील संतुलन राखणं अशक्य होत असल्याचं वाटू लागलं आहे. चंदिगड, मुंबई, जयपूर, पटणा, कोईम्‍बतूर, पुणे, लखनो, हैदराबाद, कोलकाता, दिल्‍ली, चेन्‍नई, बेंगळुरू, अहमदाबाद आणि कानपूर अशा भारतातील १३ शहरांमधील लोकांशी संवाद साधून हे  सर्वेक्षण करण्यात आलं आहे.