पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चालत किंवा सायकलनं शाळेत जाणाऱ्या मुलांना स्थूलपणाचा धोका कमी

शालेय मुलं

 हल्ली अनेक मुलं स्कूल बस किंवा स्कूल व्हॅननं  शाळेत जातात. अनेकदा शाळाही घरापासून खूप लांब  असल्यानं पालक मुलांना स्कूल बसनं शाळेत पाठवतात. पालक नोकरी करणारे असल्यानं काही पालकांना मुलांना शाळेत सोडणं शक्य नसतं. मात्र शक्य असल्यास चालत मुलांना शाळेत सोडणं त्यांच्या आरोग्यासाठी जास्त  फायदेशीर असतं. शाळेत चालत किंवा सायकलनं  जाणाऱ्या मुलांमध्ये स्थूलपणाचा धोका  कमी जाणवतो असं संशोधनातून समोर आलं आहे. 

वेगानं चालल्यास आयुष्य वाढतं!

 बीएमसी पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून हे समोर आलं आहे. जवळपास २००० हजार  प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांवर हे संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनानुसार जी मुलं चालत किंवा सायकल चालवत शाळेत जातात त्यांना स्थूलपणाचा धोका हा कमी असतो. जी मुलं शालेय उपक्रम, खेळ यात सहभागी होतात आणि जी मुलं चालत किंवा सायकल चालवत शाळेत जातात अशा मुलांमध्ये  स्थूलपणा जाणवत नाही. ही मुलं कधीही लठ्ठपणाची शिकार होत नाही. मात्र जी मुलं यातलं काहीच करत नाही अशा मुलांना लठ्ठपणाचा धोका अधिक जाणवत  असल्याचं या संशोधनात म्हटलं आहे.

रिलेशनशिपमध्ये एकटं पडण्याची भीती तुम्हालाही सतावतेय?

म्हणूनच मुलांनी खेळ, व्यायाम सारख्या  उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला पाहिजे, तरच मुलांच आयुष्य आयुष्य हे सुदृढ राहिलं असं  संशोधनात म्हटलं आहे.