पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिवाळी धुमधडाक्यात साजरी करा; पण या गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

दिवाळी २०१९

देशभरामध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र यावेळी एखादा निष्काळजीपणा तुमचा उत्साह कमी करु शकतो. दिवाळी दरम्यान फटाके फोडताना जखमी होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे डोळ्यांची जळजळ, श्वसनाला त्रास होणे, हृदयविकाराचा झटका, कान बंद होण्यासारख्या अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. अशा वेळी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सुरक्षित आणि निरोगी दिवाळी साजरी करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेला सल्ला नक्कीच वाचा....

- परवानाधारक आणि विश्वासार्ह दुकानातून फटाके खरेदी करा.

- फटाक्यांवर लावलेले लेबल वाचा आणि त्यावरील सूचनांचे पालन करा.

- फटाके फोडण्यासाठी मोकळ्या जागेवर जा.

- फटाके फोडताना आसपास आग लागण्यासारख्या वस्तू नाहीत ना हे पहा.

- फटाके फोडण्यासाठी स्पार्कलर, अगरबत्ती किंवा लाकडाचा वापर करा. जेणेकरून तुमचे हात फटाक्यांपासून दूर असतील आणि जळण्याचा धोका नसेल.

- रॉकेट सारखे फटाके जाळताना हे पहा की त्याचे तोंड खिडकी, दरवाजे किंवा इमारतीच्या दिशेने नाही ना. 

- फटाके फोडताना पायात चप्पल किंवा बूट घाला.

- फटाके फोडताना चेहरा दूर ठेवा. 

- एकट्याने फटाके फोडण्यापेक्षा सगळ्यांसोबत फटाके फोडा.

- फटाके फोडताना एखादी बादली पाणी शेजारी ठेवा.

- जर आग लागली तर ताबडतोब पाणी ओतून ती विझवा.

- फटाके फोडताना नायलॉनचे कपडे घालू नका. 

- फटाके फोडताना कॉटनचे कपडे घाला. 

- हातात ठेवून फटाके फोडू नका.

- लहान मुलांच्या हातात फटाके देऊ नका.  

- गाडीच्या आतमध्ये बसून फटाके फोडण्याचा प्रयत्न करु नका. 

- फटाके फोडताना डोळ्यांना इजा झाली तर डोळे चोळू नका.

- डोळ्यांमध्ये जळजळ होत असल्यास ते पाण्याने धुवावे आणि डॉक्टरांना दाखवावे.

- फटाक्यांचा जोरदार आवाज येत असेल तर कानामध्ये कापूस टाका.

- फटाक्यांच्या आवाजाने कान दुखत असेल तर डॉक्टरांना दाखवा. 

- फटाक्यांच्या धुरापासून अस्थमा आणि श्वसनाचा त्रास होणाऱ्या नागरिकांनी दूर रहावे.