पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बापरे सोन्याचा आयफोन, किंमत ऐकून व्हाल थक्क

अ‍ॅपल आयफोन ११

अ‍ॅपल कंपनी ही आपल्या महागड्या फोनसाठी ओळखली जाते.  अ‍ॅपलला  लक्झरी लूक देण्यासाठी आघाडीवर असलेल्या रशियन डिझायनर कंपनी कॅव्हिआरनं नुकतच अ‍ॅपल ११ चं नाताळ स्पेशल लिमिटेड एडिशन लाँच केलं आहे. या लिमिटेड एडिशनमध्ये असलेला फोन पूर्णपणे सोने आणि हिऱ्यांनी मढवण्यात आला आहे. या फोनची किंमत ९० लाखांहूनही अधिक आहे. 

नोकियाचा २.३ लवकरच होणार लाँच, जाणून घ्या किंमत

पूर्णपणे सोन्याची केस असलेला हा आयफोन असणार आहे. या फोनवर तीन कॅरेटाचा एका मोठा हिरा जडवण्यात आला आहे. हा हिरा म्हणजे बेथलहेमची चांदणी होय. त्याचप्रमाणे या मोठ्या हिऱ्याभोवती लहान हिरेही जडवण्यात आले आहेत. फोनच्या मागच्या केसवर येशू ख्रिस्ताच्या जन्माचा प्रसंगही कोरण्यात आला आहे.  

नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लवकरच दीर्घकालीन प्लॅन्स

या नाताळ स्पेशल लिमिटेड एडिशन फोनची किंमत मूळ फोनच्या किमतीपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. विशेष म्हणजे कॅव्हिआरचं हे लक्झरी कलेक्शन कोण विकत घेणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Caviar latest luxury edition of the iPhone 11 Pro is one coated in gold and diamond with the nativity scene