पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनातून बरा झालेल्या पेशंटला पुन्हा या विषाणूची लागण होते का?

कोरोनामुळे प्रत्येकजण सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घेतो आहे.

कोरोना या तीन अक्षरांनी सध्या संपूर्ण जगापुढे चिंतेचे सावट उभे केले आहे. जगातील ६० पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. चीन, इराण, इटली या देशांमध्ये कोरोनाचा फैलाव जास्त असला तरी इतर देशांमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. या स्थितीत अनेकजण या नव्या आजाराबद्दल, आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यायची याची माहिती घेत आहेत. इंटरनेटवर तर या संदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत. असा एक प्रश्न सध्या खूप मोठ्या प्रमाणात विचारला जातो आहे. एकदा एखाद्याला कोरोनाची लागण झाली आणि तो त्यातून बरा झाला तर परत त्याला कोरोना होऊ शकतो का?

होळीनिमित्त सुटीच्या काळात सुप्रीम कोर्टात पहिल्यांदाच व्हेकेशन बेंच

चीनमध्ये कोरोनाची सुरुवात झाली आणि तेथील वुहानमध्ये त्याचा वेगाने फैलाव झाला. या पार्श्वभूमीवर चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाला पुन्हा या विषाणूची बाधा होण्याची शक्यता असते. 

चीन-जपान फ्रेंडशीप रुग्णालयाचे मेंदूज्वर नियंत्रण विभागाचे संचालक लू किंगयुआन यांनी म्हटले आहे की, कोरोना झाल्यानंतर मानवी शरीरामध्ये त्याच्या एँटीबॉडिज तयार होतात हे खरे आहे. पण काही घटनांमध्ये या एँटीबॉडिज मानवी शरीरात जास्त काळ तग धरत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळेच काही रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुन्हा एकदा कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळा: मुख्यमंत्री

अर्थात, या संदर्भात आणखी संशोधन सुरू आहे. त्यानंतरच अजून नेमकेपणाने निष्कर्ष समोर येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.